चांगल्या आरोग्यासाठी गूळ खावा की साखर, घ्या जाणून…….

पूर्वी पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा. गुळही साखरेसारखा ऊसापासूनच तयार केला जातो, पण तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे.

तसेच भारतीय जेवणात गुळाचा वापर प्रकर्षाने केला जातो. भारताच्या निर्यात यादीत पहिला मान पटकवणारा पदार्थ गुळ आहे. पण हळूहळू आता गुळाची जागा ही आता साखरेने घेतली आहे. त्यामुळे गुळातील जे पोषणतत्त्व आहेत ते हळूहळू गायब होताना दिसत आहेत. पण साखर विषासारखे काम करते  साखरेचे दुष्परिणाम हे शरीरात वाढत जात आहे. त्यामुळे साखर हे अनेक आजारांचे कारण ठरत आहे. चला तर मग पाहुयात उत्तम आरोग्यासाठी गुळ हा किती फायदेशीर आहे तो…….

ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा, अन्यथा या विरोधात न्यायालयात जाणार – प्रताप अडसड

  • रोजच्या आहारात गुळाचा समावेश केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते.
  • जर वजन कमी करायचं असेल तर साखरेच्या चहाचं न पिता करता गुळाच्या चहा पिऊ शकता.
    वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
  • शरीरातील धातुंची झीज भरून काढण्याचे महत्त्वाचे कार्य गूळ करतो
  • गुळामध्ये कॅल्शिअम आणि लोहाचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात साखरेचे प्रमाण संतुलित राहते.

कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार – अजित पवार

  • मासिकपाळी दरम्यान पोटदुखी होत असल्यास गूळ खाल्ल्याने त्रास कमी होतो.
  • घसा खवखवत असल्यास गुळाचा खडा खल्ल्याने आराम मिळतो.
  • सांधेदुखीचा जर तुम्हाला त्रास असेल तर 1 ग्लास दुधाबरोबर गूळघ्या त्याने तुमचे हाडं मजबूत होतात.
  • आल्यासोबत गुळाचे सेवन केल्याने देखील सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

जाणून घ्या ऊसाच्या रसाचे फायदे, शरीरासाठी काय आहेत त्याचे फायदे…..

  • शरीरात हिमोग्लोबीन कमतरता असल्यास गूळ खाऊन ती दूर केली जाऊ शकते. गूळ, शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबीन लवकर वाढते. त्यामुळे साखरपेक्षा गुळाला पसंती द्यायला हवी.
  • जेवणानंतर गुळाचा एक खडा खाल्ल्यास पाचनशक्ती सुधारते.

महत्वाच्या बातम्या –

आवळा सरबत प्या आणि टाळा हे आजार….

मनुक्याचे पाणी पिण्याचे फायदे माहित आहेत का तुम्हाला, मग घ्या जाणून काय आहेत त्याचे फायदे