🕒 1 min read
अनेक जण आंबा म्हटलं की अगदी ताव मारतात. पण आंबाचे जितके फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत. त्यामुळे आंबा खाताना जरा नियंत्रणात खाणंच फायद्याचं ठरेल.
हे आहेत आंबा खाण्याचे फायदे –
-आंब्यात विटॅमिन सी, ए आणि विविध प्रकारचं कॅरोटेनॉइड असतात. तसेच जिंक मोठ्या प्रमाणात असंत. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
-अॅनीमियाच्या रुग्णांसाठी आंबा नैसर्गिक वरदान आहे. आंब्यात असणारं लोह शरीरासाठी फायदेशीर आहे. आर्यन आणि कॅल्शियम वाढवण्यासाठी आंबा अतिशय गुणकारी आहे.
-आंबा विटॅमिन आणि खनिजांचा चांगला स्त्रोत असल्याने शरीराला हायड्रेटेट ठेवतो. एका अभ्यासात शरीराचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आंबा फायदेशीर ठरतो.
-आंबा खाण्याच्या अनेक फायद्यांपैकी एक फायदा म्हणजे आंबा त्वचेला आतून साफ करतो. आंब्यात भरपूर प्रमाणात बीटा-कॅरोटीन आणि विटॅमिन ए असतं. आंब्यात असणारे कॅरोटीनॉइड त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते.
हे आहेत आंबा खाण्याचे तोटे –
-एका मध्यम आकाराच्या आंब्यात १३५ कॅलरीज असतात. अधिक प्रमाणात आंबा खाल्याने वजन वाढते.
-आंब्यात मोठ्या प्रमाणात साखर असते. नैसर्गिक साखर शरीरासाठी, आरोग्यासाठी चांगली असते. पण आंब्याचं अधिक सेवन केल्याने ब्लड शुगरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आंब्याचं सेवन नियंत्रणात करावं.
-आंबा गरम फळ आहे. त्यामुळे त्याच्या अधिक सेवनाने चेहऱ्यावर किंवा शरीरावरही मुरुम, पुरळ येऊ शकतात.
जाणून घ्या आर्द्रकचे गुणकारी फायदे
-ज्या लोकांना संधिवात किंवा सायनस आहे अशा लोकांनी आंब्याचं सेवन कमी प्रमाणात करावं. कच्ची कैरी किंवा आंब्याच्या अतिसेवनाने संधिवात आणि सायनसचा आजार वाढू शकतो.
-आंब्याच्या देठाजवळ असणारा द्रव पदार्थ खाण्याआधी साफ करा. तो तसाच खाल्याने घशाला त्रास होऊ शकतो. घसा दुखू लागतो किंवा सूजही येऊ शकते.
लहान मुलांच्या पोटदुखीवर हिंग हा एकमेव उपाय https://t.co/nMSSLvp0h8
— KrushiNama (@krushinama) January 15, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





