आंब्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

आपल्या सर्वांचे आवडते फळ म्हणजे आंबा. असा कोणी नसेल की, ज्याने आंबा खाल्ला नसेल. आंब्याच्या हंगामात प्रत्येकजण आंब्याची चव चाखत असतो. आंबा खाल्ल्याने अनेक फायदे आरोग्यासाठी चांगले आहे, पण तुम्हाला माहिती आहे का आंब्याचे पानेही आरोग्यदायी आहेत. हो आंब्याच्या पानांचा आपल्या आरोग्यसाठी फायदा होतो. आंब्याच्या पानांत बरेच औषधी गूण आहेत. आंब्याच्या पानांचे फायदे इतके वैविध्यपूर्ण आणि व्यापक आहेत. हे पाने जेव्हा उमलतात तेव्हा पानांचा रंग हा लालसर व जांभळा असतो. त्यानंतर हिरव्या रंगात वाढतात. आंब्याच्या पानांमध्ये अ, ब, आणि सी जीनवसत्वासह अनेक पौष्टिक घटक असतात. आंब्याच्या पानांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोल्सची मात्रा जास्त असल्याने त्यांना अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. चला तर जाणून घेऊ फायदे….

  • आंब्याच्या पानामुळे किडनी स्टोनची समस्या दूर होते. यामुळे किडनी देखील हेल्दी राहते. ज्यांना स्टोनची समस्या उद्भवते त्यांनी आंब्याची पानं खाल्ल्यास त्यांचे गॉल ब्लडरमध्ये स्टोनची समस्या उद्भवत नाही.
  • पोटाच्या आजारात आंब्याची पानं गरम पाण्यात टाकून ठेवा आणि सकाळी यातले पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. हे पाणी रोज प्याव आणि यामुळे पोटाच्या अनेक समस्या आपोआप कमी होतात.
  • आंब्याची पानं ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण यात असलेले टॅनिन इंसुलिनचं प्रोडक्शन वाढवते आणि त्यामुळे ग्लुकोज शरीरात वाढत नाही. आंब्याच्या पानातील हायपोग्लाइसेमिक प्रभावामुळे ब्लड शुगरची पातळी कमी होते. रोज सकाळी एक चमचा आंब्याची पानाचं सेवन केल्यानं ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहतं.
  • जर का तुम्हांला कोलेस्ट्रॉलची समस्या आहे तर आंब्याची पानं तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. आंब्याच्या पानात फायबर, पेक्टिन आणि व्हिटामिन सीचं प्रमाण जास्त असते आणि एलडीएल किंवा हानिकारक कोलेस्ट्रॉलचा स्तर देखील कमी करण्यासाठी काम करतात. याव्यतिरिक्त तुमचं आरोग्य देखील चांगलं राहतं.
  • आंब्याची पानं दमा सारखा आजारावर सुद्धा कंट्रोल करण्यासाठी काम करते. या पानाचा काढा बनवून त्यात थोडंस मध मिसळून तुम्ही ते पिऊ शकता.

महत्वाच्या बातम्या –