शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, जाणून घ्या

शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, जाणून घ्या anemia cells

शरीरात रक्त कमी असेल किंवा हिमोग्लोबीन कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो. थंडीच्या दिवसांमध्ये विशेषता याचं प्रमाण वाढतं. बऱ्याचवेळा शरीरात रक्ताचं लोहाचं प्रमाण योग्य असलं तरीही रक्त कमी असतं. या रुग्णांमध्ये शरीरातील ऊर्जेचं प्रमाण आणि रक्ताचं प्रमाण कमी असल्यानं लवकर थकतात. यासाठी योग्य आहारासोबत काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टीप्स सांगणार आहोत.

  • ग्लासभर पाण्यात लिंबू पिळा.त्यात चमचाभर मध एकत्र करून प्या.
  • रोजच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा.
  • रोज सफरचंदाचा १ ग्लास रस प्यायल्यास उत्तम/सफरचंदाच्या रसात बिटाचा रस+ मध टाका.या मिश्रणात लोहाचे प्रमाण जास्त असते.
  • थोडेसे सैंधव मीठ + थोडी मिरी पावडर डाळींबाच्या रसात एकत्र करून रोज पिण्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते.
  • १ ग्लास टोमॅटोचा रस/ टोमॅटो सूप पिऊन देखील रक्त वाढ होण्यास मदत होते.
  • रात्रीचे जेवण झाल्यावर शक्य असल्यास शेंगदाणे+ गूळ एकत्र खा.रक्त वाढीसाठी हे फायदेशीर आहे.
  • शरीरातील रक्ताची उणिव भरण्यासाठी रात्री झोपताना काही वेळ अगोदर दुधामध्ये खजूर टाका मग दूध प्यावे.
  • हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मक्याचे दाणे फायदेशीर आहे.मका भाजून /उकडून खाऊ शकता.

महत्वाच्या बातम्या –