डाळिंबाची निर्यात होत असल्याने डाळिंबाला चांगले दर

सांगलीमधून गेल्यावर्षी ८०० टन डाळिंबाची निर्यात झाली होती. यंदा १०६ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. कोरडवाहू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी डाळिंब वरदान ठरते आहे.  गेल्यावर्षी पाण्याची टंचाई तर यंदा अतिवृष्टीमुळे डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा स्थितीतही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डाळिंबाची निर्यात करण्यासाठी नोंदणी केली आहे.

जाणून घ्या, सर्पदंश झाल्यावर काय करावे?

जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र ८ हजार हेक्टर इतके आहे. शेतकऱ्यांकडून मृग, हस्त आणि आंबे बहार घेतला जातो. वास्तविक डाळिंबाचा सर्वाधिक हंगाम मृग बहरातील असतो. त्यानुसार शेतकरी नियोजन करतो. आटपाडी तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र असून त्यानंतर जत तालुक्यात डाळिंबाची लागवड आहे.

राज्यात कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक

डाळिंबाची निर्यात होत असल्याने डाळिंबाला चांगले दर मिळू लागले आहेत. त्यामुळे परकीय चलन जिल्ह्याला मिळू लागले आहे. निर्यात करण्यासाठी आटपाडी तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी गट पध्दतीने डाळिंबाची शेती करू लागले आहे. याच तालुक्यातील सुमारे पन्नासहून अधिक शेतकऱ्यांची डाळिंब निर्यातीसाठी पात्र ठरली आहेत.