कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांच्या याद्या ह्या कुठे आणि कधी पाहायला मिळतील ; घ्या जाणून …..

कर्जमुक्ती योजना

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली असून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ होणार आहे. ही कर्जमाफी सरसकट असून, त्यासाठी कोणत्याही अटी शर्थी लागू नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ह्या कर्जमाफी योजनेचा फायदा राज्यातील ३४ लाख शेतकऱ्यांना होणार आहे त्याचबरोबर त्यांची नावानिशी यादीही शासन जाहीर करणार आहे. या कर्जमाफी योजनेच्या स्वरूपाविषयी बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती ही एकूण २९ हजार ७१२ कोटी रुपयांची असेल.

३० सप्टेंबर, २०१९ पर्यंत दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी ज्या शेतकऱ्यांची असेल त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांनी या लाभार्थींच्या याद्या तयार केल्या आहेत. या याद्या शासनाच्या वेबसाइटवर १५ फेब्रुवारीपासून अपलोड करण्यात येणार आहेत. या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल आणि मे २०२० पर्यंत ती पूर्ण करण्यात येईल. लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या ह्या ग्रामपंचायत पातळीवर देखील पहायला मिळतील असेही सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या –

मृद व जलसंधारण विभागांतर्गत नागपूर येथे मुख्य अभियंता तथा अपर आयुक्तांचे कार्यालय

पीकविमा अर्ज भरण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सुविधा केंद्र सुरू – अनिल बोंडे

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ; तूर खरेदी केंद्र कधी उघडतील याची शाश्वती नाही

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी १ कोटी २० लाख रुपये अदा