मोठी बातमी : डिझेल गाडीचे इंजिन बदलून करू शकता CNG किंवा LPG !

पुणे – वाढत्या डिझेल च्या किमती त्यामुळे अनेकांचे कंबर मोडले आहे. CNG किमंत बऱ्यापैकी असल्याने अनेकांना CNG गाडी असावी असे वाटते त्यांच्यासाठी मोठी बातमी समोर आली असून डिझेल इंजिन असलेल्या वाहनांचे रुपांतर आता सीएनजी किंवा एलपीजी इंजिनमध्ये करता येणार आहे अशी अधिसूचना २७ जानेवारी २०२२ रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जरी केली आहे.

एलपीजी किटच्या रेट्रो फिटिंग करण्यास तसेच डिझेल इंजिन ऐवजी CNG , LPG इंजिन बसवण्यास तसेच बदलण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. वाहतूक मंत्रायलय तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सांगितले आहे कि ३.५ टनांपेक्षा लहान भारत स्टेज ६ (BS-VI) वाहनांच्या बाबतीत हा नियम लागू होणार आहे.

सध्या BS-IV उत्सर्जन नियमांनुसार , मोटार वाहनांमध्ये CNG आणि LPG किटचे रेट्रो फिटमेंट करता येते
तसेच CNG हे पर्यावरणपूरक इंधन आहे आणि पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या तुलनेत कार्बन मोनोऑक्साइड, हायड्रोकार्बन, कण आणि धूर यांचे उत्सर्जन कमी करते असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या –