राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; अतिवृष्टीग्रस्तांना तब्बल २ हजार ८६० कोटींचा निधी मंजूर

मुंबई – राज्यात मागील २ ते ३ महिन्यात म्हणजेच जून ते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी येत आहे कि ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना दोन हजार ८६० कोटी ८४ लाख रुपयांची वाढीव दराने मदत देण्यात येणार आहे. राज्यात ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत झालेली अतिवृष्टी व विविध जिह्यांत उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे शेती पिकांचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते. त्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेले मदतीचे प्रस्ताव या सर्व विभागीय आयुक्तांकडून मागवण्यात आले होते. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी राज्याच्या महसूल व वन विभागाने २ हजार ८६० कोटी ८४ लाख ७ हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

तर, राठवाड्यात ४७ लाख ७४ हजार ४८९ शेतकऱ्यांचे ३६ लाख ५२ हजार ८७२ हेक्टरचे नुकसान झाले होते. त्यानुसार वाढीव दरानुसार ३,७६२ कोटींचा अतिवृष्टीसाठीची मदत राज्य सरकारच्या घोषणेनुसार मंजूर झाली आहे. त्यापैकी राज्य शासनाने ७५ टक्के याप्रमाणे मराठवाड्याला २,८६० कोटींचा निधी मंजूर झाला. राज्य शासनाने याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांपासून हा निधी वितरित करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

१३ ऑक्टोबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहा हजार कोटींचे पॅकेज घोषित केले होते. दिवाळीपूर्वी हे मदतीचे अनुदान देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे शासनाचा निधी कधी येणार याची प्रतीक्षा होती. विरोधी पक्षाच्या वतीनेही दिवाळीत पैसे मिळणार की नाही याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण आता निधी प्राप्त झाल्याचे आदेश आले आहेत. एका दिवसात ही रक्कम बीडीएसवर जमा होऊन त्यानंतर एका दिवसात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मिळेल. त्यानंतर तहसीलदारांच्या माध्यमातून बँकेला निधी देत या निधीचे वाटप होईल.

महत्वाच्या बातम्या –