हिरव्या मिरचीचे आरोग्यासाठी ‘हे’ आहेत फायदे

आपल्याकडे वडापाव सोबत हिरवी मिरची आवर्जून खाणारे लोकही आहेत आणि पोह्यातल्या मिरच्या बाजूला काढून खाणारे लोकही आहेत. जास्त तिखट खाणे आरोग्यासाठी चांगले नसते अशी एक समजूत आपल्याकडे आहे. तुम्ही या समजुतीमुळे हिरवी मिरची खाणे टाळत असाल तर आता असे करू नका. चला तर मग जाणून घेऊया  हिरव्या मिरचीचे फायदे…

आरोग्यासाठी केळी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

  • हिरवी मिरची खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते.
  • हिरव्या मिरचीत असणाऱ्या व्हिटॅमिन A मुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
  • हिरव्या मिरची ही व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन C, लोह, पोटॅशिअम सोबतच कार्बोहायड्रेट्स सारख्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक पोषकतत्वांचा उत्तम स्रोत आहे.

निरोगी राहण्यासाठी नियमित खा ‘भाकरी’

  • रव्या मिरचीत असणारे व्हिटॅमिन C जेवणानंतर शरीरात लाळ निर्माण करण्यासाठी मदत करते, त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे होते.
  • हिरव्या मिरचीत प्रतिजैविकांचाही गुणधर्म आढळून येतो, त्यामुळे शरीर निर्जंतुक राहण्यास मदत होते.

महत्वाच्या बातम्या –

रुईच्या झाडाचे दैनंदिन जीवनातील उपयोग; जाणून घ्या

रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? जाणून घ्या