चिंता वाढली! राज्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटनच्या रुग्णसंख्येत वाढ

नवी दिली : दक्षिण अफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण अनेक देशांमध्ये सापडले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाने पुन्हा धास्ती घेतली आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने आवश्यक ते खबरदारीची पावले उचलत आहेत. कोरोनाची लाट ओसरली नाही तोच या नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. भारतामध्येही या नव्या व्हेरिएंटचे २ रुग्ण आढळले. त्यानंतर आज(६ डिसें.) ओमायक्रॉनचा(Omicron) आठवा रुग्ण भारतात सापडला आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ओमायक्रॉन या विषाणूचे पुणे-पिंपरीमध्ये आठ रुग्ण आढळले असून त्यात नायजेरियातून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या तिघांसह त्यांच्या संपर्कातील तिघे आणि फिनलंडहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या आठ झाली आहे.

दरम्यान, राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी सुरू असून, रविवारपर्यंत चार हजार ९०१ प्रवासी अतिजोखमीच्या देशांमधून आले. २३ हजार ३२० प्रवासी अन्य देशांतून आले आहेत. अतिजोखमीच्या देशांमधून आलेल्या सर्वाची, तर अन्य देशांमधून आलेल्या ५४३ जणांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात आली. त्यापैकी नऊ प्रवाशांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या –