एरंडेल तेलाला अमृताची उपमा, जाणून घ्या फायदे

एरंड ही वनस्पती अशी आहे की आने, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडाचे कोळसेसुद्धा काही प्रमाणात मसाल्यात घालतात. आरोग्यशास्त्रदृष्ट्या हे अत्यंत महत्त्वाचे. अशा वनस्पतीचा परिचय माहित असणे जरून आहे. एरंडेल तेलास अमृताची उपम दिली आहे. अंगास लावल्यास, पोटात घेण्यास डोके व तळ पायांना शांतता येण्याकरीता हे तेल अवश्य वापरतात. या तेलाच्या दिव्यानेसुद्धा डोळ्यांना थंडावा येतो. यामध्ये तांबडा अशा दोन जाती आहेत. दोन्हीहि जाती श्रेष्ठ आहेत.

कमला ( कावीळ ) –
सर्व शरीर पिवळे झाले आहे. डोळे पिवळे आहेत, नखे पिवळी झाली. थोडाफार ताप येत असेल, यकृताची वाढ झाली आहे, अशा वेळी एरंडाच्या पानाचे कोवळे मोख व मेंदीचा पाला एकत्र वाटुन तो दुधात मिसळावा ते दूध रोज सकाळी व सायंकाळी घ्यावे अगर एरंडाच्या सालीचा रस काढून त्या रसात दूध घालून ते दूध रोज प्यावे. कसलीही कावीळ बरी होते.

शूल –
पोटात बारीक बारीक व राहून राहून दूखत असेल तर, भुक लागत नाही, अन्नाचे पचन होत नाही, अस्वस्थता वाटते. अपचन, करपट ढेकर, अन्नावर वासना नसते अशा वेळी एरंड मुळाचा काढा एक अष्टमांश करावा व त्यामध्ये हींग, पादेलोण, व सुंठीची पूड घालून निदान चार सप्तके द्यावा.

वृषण वृद्धि –
वृषणाची वृद्धि होते व हवेने भरलेल्या पिशवीसारखे वृषण लागते.या अवस्थेत सुरुवातीस एरंडेल तेलाचे सावकाश मसाज करावे व एरंडास पानतूप लावून वृषणास बांधून घट्ट पट्टा अगर लंगोट घालावा.

दमा –
सारखा श्वास लागतो. चावत नाही छाटी भरल्यासारखी वाटते. चढण चढवत नाही. अशावेळी एक पट एरंडेल तेल, दुप्पट मध एकत्र करून घेतले असता बरे वाटते. सर्वच दमेकऱ्यांना हे औषध उपयोगी पडते. त्यामुळे कोठा साफ होतो व मलाची सुद्धता झाली म्हणजे श्वास कमी होतो.

खुपऱ्या –
डोळ्यात खुपऱ्या असतात. डोळे लाल होतात. पाणी येते. चिकटतात. लाल एरंडाचा चीक डोळ्यात घालीत जावा. शरीरामध्ये होणाऱ्या कोणत्याही शुलावर एरंडाचा युक्तीने उपयोग करावा.

ओठ फुटणे –
अनेक वेळा थंडीने किंवा उष्णतेने सुद्धा ओठांना भेगा पडतात. भेगा तडतडतात, रक्त येते. अश वेळी रात्री एरंड्या बारीक वाटुन त्यात थोडे दुध घालावे व ते मिश्रण ओठांना लावावे. भेगा मऊ पडून आराम वाटतो.

महत्वाच्या बातम्या –