Share

दररोज झोपण्याअगोदर खा उकळलेलं केळं, ते खाल्याने होईल खूप मोठा फायदा

Published On: 

🕒 1 min read

मूसा जातिच्या झाडांना आणि त्याच्या फळास केळी असे म्हणतात. केळीचे मूळस्थान दक्षिण पूर्व आशिया मानले जाते. सध्या संपूर्ण उष्णकटिबंधीय प्रदेशात याची लागवड केली जाते. प्रामुख्याने फळांच्या उत्पादनासाठीच याची लागवड करण्यात येते केळाच्या झाडाची उंची २ ते ८ मीटर तर पानाची लांबी हि साडेतीन मीटर असू शकते. केळीची लागवड कंदापासून केली जाते. केळाच्या झाडाची उंची २ ते ८ मीटर तर याच्या पानाची लांबी हि साडेतीन मीटर असू शकते. केळीला येणारी फळे हि घडामध्ये येतात याला लोंगर असे म्हणतात. एक घडामध्ये साधारणत: १० फण्या असतात तर एका फणीस १६-१८ केळी असतात. याचे फुल/फुलोरा हे तपकिरी रंगाचे असते.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून गोंदिया जिल्ह्यातील बोदलकसा येथे पौर्णिमा महोत्सव

केळे हे बिनबियांचे सर्वात जुने फळ आहे. निसर्गतच जंतुनाशक वेष्टनामध्ये असल्याने, केळ्यातून जंतूंची बाधा होत नाही, त्यामुळे आपोआपच सर्वाचे आरोग्य उत्तम राहते. वर्षभर उपलब्ध असणारे, सर्वाच्या खिशाला परवडणारे हे फळ आबालवृद्धांना आवडते. तसेच केळ्यामध्ये पोषणमूल्य अनेक असल्यामुळे सकस आहारामध्येच त्याची गणना केली जाते. यामध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिने, खनिजे, अ,ब,क,ड,ई जीवनसत्त्वे, कॅल्शिअम व फॉस्फरस तसेच शरीराला ऊर्जा देण्याची शक्ती व उष्मांक भरपूर प्रमाणात आहेत. सर्व फळांमध्ये केळे हे अधिक उष्मांक देणारे फळ आहे. केळ्यामध्ये नसíगकरीत्या असलेली साखर ही सहज पचणारी असल्याने शरीराचा थकवा जाऊन लगेचच उत्साह निर्माण होतो. म्हणून केळ्याची गणना शक्तिवर्धक फळांमध्येही होते.चला तर आज आपण जाणून घेऊयात झोपण्याअगोदर उकळलेलं केळं खाल्याने कुठला मोठा फायदा होतो.

शरीराला कॅल्शिअम मिळणार –

औषधीय असलेलं केळं अतिशय फायदेशीर असतं. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल किंवा चांगली झोप लागत नसेल तर याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. कारण केळ्याचं सेवन केल्यावर ही समस्या दूर होईल. झोप येत नसल्यास सालीसह केळ्याची चहा बनवून प्यायलास याचा फायदा होईल. एक आठवडा असं केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल. तसेच सकाळी स्वतःला रोजच्यापेक्षा अधिक फ्रेश अनुभवाल. तसेच केळ्यात असणाऱ्या कॅल्शिअममुळे शरिरात ताकद निर्माण होते. आणि हाडांना मजबूती देखील मिळते.

इस्रायली तंत्रज्ञानाने शेतकऱ्याने केली पिवळ्या कलिंगडाची यशस्वी लागवड

कसे बनवावे – 

झोपेची समस्या सतावत असेल तर तुम्ही हा प्रयोग नक्की करून पाहा. लहान आकाराचे केळं, दालचिनीचा तुकडा आणि एक कप पाणी घ्या. एका भांड्यात पाणी आणि दालचिनी घेऊन उकळा. पाणी चांगल उकळल्यानंतर केळ्याचे छोटे छोटे तुकडे करून त्यामध्ये टाका. हे मिश्रण 10 मिनिटे कमी आचेवर शिजवा. यानंतर हे सर्व मिश्रण चहा प्रमाणे घ्या.

असं केल्यानंतर झोपेच्या समस्यांपासून तर सुटका होईल किंवा रात्री झोपेत सतत जाग येण्याची समस्या असेल त्याला देखील फायदा होईल. असंच नाही तर केळ्याची साल देखील सर्वात गुणकारी आहे. केळ्याच्या सालीमध्ये मॅग्नेशिअम आणि पोटेशिअम असते.

महत्वाच्या बातम्या –

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे शेतकरी आत्महत्या

भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा तपासणी यंत्रणा सक्षम नाही

आरोग्य बातम्या (Main News) विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या