बी- बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

जालना : मागील वर्षी पाऊस नसल्याने शेतक-यांच्या हातून खरीप व रबीचे पीक गेले आहे. यामुळे यंदा वेळेवर पाऊस पडेलं. पीक जोमाने येईल. या आशेवर शेतकरी उन्हाळ्यातच शेतीच्या कामाल लागला होता. त्यामुळे कृषी विभागातर्फे वेळेवर शेतक-यांनी बी- बियाणे मिळावे, यासाठी परिपूर्ण तयारी करण्यात आली होती. दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना मृग नक्षत्रात पाऊस बरसेल आणि पेरणीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फेल ठरली.

शनिवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी विजेच्या कडकडाटासह धो-धो पाऊस बरसला. त्यामुळे रविवारी बियाणे बाजारात शेतकऱ्यांनी  बी- बियाणे खरेदी करण्यासाठी खूप गर्दी केली होती. पसंती कपाशीचे पॉकेट खरेदी करण्याला बळीराजा सर्वाधिक पसंती देत होता. दिवसभरात सरासरी साडेचार ते पाच लाख कपाशीच्या पॉकेटची विक्री झाल्याचे सांगण्यात आले आहे.

संयुक्त आणि मिश्र तसेच रासायनिक खतांचा जवळपास ६५ हजार मेट्रीकटन साठा उपलब्ध करून देण्यात आला होता. बीटी बियाणांच्या वेगवेगळ्या पाच ते सात कंपन्यांच्या बीटी बियाणांची जवळपास आठ लाख २५ हजारांपेक्षा जास्त पाकिट बाजारात दाखल झाले होते.

शनिवारी वातावरणा बदल झाला आणि विजेच्या कडकडाटासह जिल्ह्यात हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरण्यासाठी बी- बियाणांची खरेदी केली. थोडेफार पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे.

फणसाचे प्रकार व त्यापासून बनणारे रुचकर पदार्थ

पुण्यात सर्वात उशिरा मॉन्सून दाखल…