Share

मधात भिजलेले बदाम खाल्ल्यास होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

Published On: 

🕒 1 min read

आयुर्वेदामध्ये बदाम आणि मध दोघांनाही औषधी मानले गेले आहे. यांच्या वेगवेगळ्या सेवनाने अनेक फायदे होतात. मात्र यांना एकत्रित खाल्ल्याने अनेक फायदे मिळू शकतात. आपण जर १ महिना रोज मधात भिजलेले 3 बदाम खाल्ले तर त्यामुळे अनेक फायदे मिळतील. तुम्ही मधामध्ये बदामाला भिजवून ठेवून नंतर ते खाऊ शकता किंवा बदाम आणि मध दोन्ही एकत्रितपणे खाऊ शकता.

  • मेंदूसाठी हे एक टॉनिक आहे. यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहते.
  • प्रोटीनचा उत्तम सोर्स असल्यामुळे स्नायू मजबूत आणि सशक्त बनतात. यामुळे अशक्तपणा दूर होतो.
  •  केसांना मजबूत ठेवण्यासोबतच डोळ्याची शक्तीही वाढवतात.
  • यांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होईल तसेच ह्रदयही निरोगी राहील.
  • एजिंगला थांबवते व त्वचा निरोगी ठेवते.
  • यातील अँटीलर्जिक आणि अँटीबॅक्टेरिअल गुणांमुळे घशाचे आणि फुप्फुसाचे आजार दूर राहतात.

महत्वाच्या बातम्या –

बातम्या (Main News) आरोग्य विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या