हिवाळ्यात पेरू हे फळं बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पेरूचे अनेक फायदे आपल्याला माहित असतात. आत्तापर्यंत तुम्हाला पिकलेल्या पेरूचे फायदे माहित असतील पण कच्च्या पेरूचे सुद्धा अनेक फायदे आहेत ते तुम्हाला माहितही नसतील.व्हिटामीन्स आणि मिनरल्सचे प्रमुख स्त्रोत असलेले पेरू हे फळं आहे. तसंच पेरूच्या सेवनाने शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. अनेक आजारांपासून बचाव होण्यासाठी पेरूचा आहारात समावेश करावा. अनेक पोषक घटक पेरू या फळात असतात.
-मधूमेह, मोतीबिंदू, खोकला, हद्यविकाराच्या आणि वजन कमी होण्याच्या समस्येसाठी पेरूचे सेवन उपयुक्त ठरत असते. पेरू कॉलेस्ट्रॉल कमी करून उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून वाचवतो.
पाल घरातून घालवण्यासाठी काही घरगुती उपाय
-मलावरोधाचा त्रास होत असेल तर सलग तीन-चार दिवस पेरूचे सेवन करावे. यामुळे आतडय़ांची हालचाल वाढून घट्ट मल पुढे सरकला जातो व पोट साफ होते. तसंच तोंडाचा अल्सर बरा करण्यासाठी कच्चा पेरू उपयुक्त ठरत असतो.
-पेरूच्या पानांचा काढा करून त्याने गुळण्या केल्यास किंवा तो काढा थोडा वेळ तोंडात धरून ठेवल्यास दंतविकार, हिरडय़ांची सूज व मुख विकार दूर होतात.
शेतकऱ्याच्या “कबिरे” ला भावपूर्ण निरोप, घरासमोर उभारली समाधी
-सकाळी सकाळी उपाशीपोटी पिकलेला पेरू खाणे खूप फायद्याचे ठरते. जर तुमच्या तोंडातून वास येत असेल तर पेरूचे पानं चावल्यास फायदेशीर ठरते.
-पेरूच्या पानांना वाटून त्याचे पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट डोळ्यांच्या खाली लावायची. यामुळे डोळ्यांचा खाली असणारे काळे डाग व सूज कमी होते.
नागपुरात पावसामुळे तापमान सरासरीपेक्षा ८ अंशाने घरसले खाली https://t.co/NnMLHAPwCd
— Krushi Nama (@krushinama) February 8, 2020