सीताफळपासून बनवा विविध प्रक्रियायुक्त पदार्थ, जाणून घ्या

सीताफळ हे मुळच्या उष्णकटिबंधीय अमेरिका आणि वेस्ट इंडीज भागामधील Annona squamosa नावाच्या झाडाचे फळ आहे. स्पॅनिश व्यापार्यांनी ते आशियामध्ये आणले होते. ह्या फळाचे जुने मेक्सिकन नाव, अता अजून बंगाली व इतर भाषांमध्ये मध्ये आढळते. सीताफळ हे हिरव्या रंगाचे एक गोड फळ आहे. खरे तर याचे नांव शीतफळ. नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सीताफळ असा झाला. सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. सीताफळ हे मूळचे वेस्ट इंडिज बेटे व दक्षिण अमेरिकेचे. त्यानंतर ते भारतात आले. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करता जाते.

  •  सीताफळ गर

प्रथम पिकलेली निरोगी चांगली सिताफळे निवडुन घेऊन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर फळांचे दोन भाग करावेत. बियांसहीत गर अलगदपणे चमच्याने काढुन घ्यावा. हा काढलेला गर मिक्सरला लावुन 1 मि.मी. स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घ्यावा. त्यामध्ये 500 पीपीएम सायट्रीक आम्ल व 700 पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाईड मिसळुन गरम करावा. हा गर निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये किंवा रिटॉर्टिबल पाऊचेसमध्ये भरुन हवाबंद करावा. पाश्चराईज करुन थंड करुन लेबल लावुन थंड ठिकाणी (शितगृहात -180० से.ग्रे. तापमानात साठवुन ठेवावा). सीताफळाच्या गरापासुन पावडर, जॅम, पेये, सिरप, मिल्क शेक, रबडी, आईस्क्रिम, श्रीखंड हे पदार्थ तयार करता येतात.

  •  गराची पावडर

फळांचा काढलेला गर घेऊन त्यामध्ये 500 पीपीएम सायट्रीक आम्ल व 700 पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाईड व 2-3 टक्के माल्टोडेक्स्ट्रीन मिसळुन स्प्रे ड्रायरमध्ये किंवा ड्रम डायरमध्ये 5-8 टक्के पाण्याचा अंश येईपर्यंत वाळवावा. यानंतर तयार झालेली पावडर निर्वात केलेल्या पिशवीमध्ये भरुन थंड ठिकाणी साठवुन ठेवावी. अशा प्रकारे तयार झालेली पावडर आईस्क्रिम, कन्फेक्शनरी तसेच श्रीखंड, मिल्कशेक, टॉफी इ. पदार्थ तयार करतांनी वापरता येते. औद्योगिकस्तरावर गराची पावडर हा महत्वपुर्ण घटक म्हणुन वेगवेगळे पदार्थ बनविण्यासाठी उपयोग होतो. तसेच त्यात पाण्याचा अंश कमी असल्यामुळे ते जास्त काळ टिकून राहते.

  •  जॅम

गराच्या वजनाएवढी साखर मिसळुन तो गरम करावा, सतत ढवळत राहावे. नंतर 2-5 ग्रॅम प्रतिकिलो गर या प्रमाणात सायट्रिक आम्ल मिसळुन ते मिश्रण घट्ट होईपर्यंत म्हणजेच तुकड्यांत पडेपर्यंत शिजवावे. या वेळी मिश्रणाचा टिएसएस 68-69 टक्के असतो. तयार झालेला जॅम निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरुन बाटल्या थंड करुन, त्यावर मेणाचा थर देऊन किंवा एल्युमिनियम फॉईल लावुन, हवाबंद करुन झाकण लावावे. बाटल्या थंड जागी साठवाव्यात.

  •  सरबत

गर 15 टक्के साखर, 15 टक्के सायट्रीक आम्ल, 0.25 टक्के घेऊन उत्तम प्रकारे सरबत करता येते. प्रथम गर घेऊन त्यामध्ये प्रमाणात मोजुन घेतली साखर, सायट्रीक आम्ल व पाणी मिसळुन ते चांगले ढवळुन घ्यावे. हे मिश्रण मलमलच्या कापडातुन गाळावे. जर हे सरबत जास्त काळ साठवुन ठेवायचे असल्यास ते गरम करुन त्यामध्ये 100 पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाईड मिसळुन निर्जंतुक केलेल्या 200 मि.ली. च्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरुन, झाकण लावावे (1-2 महिने).

  •  श्रीखंड

सिताफळाचा गर 100 ग्रॅम, साखर 500 ग्रॅम व 400 ग्रॅम चक्का मिसळुन मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावे. त्यामध्ये ड्रायफ्रुटस टाकुन फ्रिजमध्ये ठेवुन थंड करावे.

  • मिल्कशेक

गाईचे किंवा म्हशीचे स्वच्छ दुध गाळुन घेऊन गरम करुन ते प्रमाणित करावे. नंतर ते 70० से. तापमानास 15 मिनिटे गरम करावे. त्यामध्ये 0.40 टक्के सोडियम ऐल्जिनेट मिसळुन 10 टक्के साखर आणि 10 टक्के गर किंवा पावडर मिसळुन हे मिश्रण चांगले गाळुन घ्यावे. त्यानंतर 70० सेल्सिअस तापमानास 30 मिनिटे गरम करावे. नंतर ते 100० सेल्सिअस तापमानास तीन तास थंड करुन घ्यावे. परत ते 20० अंश सेल्सिअस ते 40० अंश सेल्सिअस तापमानाला सात मिनिटे थंड करुन मिक्सरला घुसळवुन घ्यावे.

  •  रबडी

1 लिटर दुध एका नॉनस्टिक पॅनमध्ये घ्या व दुध अर्धे झाले की 2 चमचे साखर टाका. साखर विरघळली की, चिमुटभर सोडा टाका व हलवुन घ्या. शेवटी 1 कप सीताफळ पल्प टाकुन मिसळुन घ्या. 1 मिनिट गॅस बंद करा. थंड होऊ द्या. तयार झालेल्या मिश्रण फ्रिजमध्ये 1 तास ठेवावे. साखरेचे प्रमाण कमीच असावे कारण साखर जास्त टाकली की सीताफळाची चव निघुन जाते.

  •  सीताफळ आईस्क्रिम

दुध, साखर, दुध पावडर एकत्र करा. व गॅसवर ठेवुन सतत 5 मिनिटे हलवत रहा. थंड झाले की फ्रिजमध्ये 10 तास ठेवा. 10 तासाने विप करुन घ्या नंतर अर्धा सीताफळाचा पल्प टाका व 10 मिनिटे विप करा. नंतर अर्धा सीताफळाचा पल्प टाका व मिक्स करा. हवा बंद डब्यात ठेवा. डब्बा 12 तास फ्रिजरमध्ये ठेवा.

महत्वाच्या बातम्या –