सर्दी–खोकला दूर करण्यासाठी ‘या’ पद्धतीने कांद्याचा उपयोग करा

कांदा हे व्‍यापारिदृष्‍टया सर्वात महत्‍वाचे भाजीपाला पिक आहे.  भारतीयांच्‍या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणा-या राज्‍यात क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 1.00 लाख हेक्‍टरवर  कांद्याची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर सातारा हेक्‍टरी जिल्‍ हेक्‍टरी कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत.

तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्‍दा काही जिल्‍हयांमध्‍ये कांद्याची लागवड केली जाते. नाशिक जिल्‍हा हा महाराष्‍ट्रात नव्‍हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्‍यात प्रसिध्‍द आहे. एकूण उत्‍पादनापैकी महाराट्रातील 37 टक्‍के तर भारतातील 10 टक्‍के कांद्याचे उत्‍पादन एकटया नाशिक जिल्‍हयात घेतले जाते.

 चला तर जाणून घेऊ पद्धत –

  • सिरप तयार करण्यासाठी कांद्याचा तुकडा एका वाटीत टाका. त्यामध्ये मध मिसळा. दहा ते १५ तास भिजू द्या. त्यानंतर  तुमचं सिरप तयार होईल.
  • कांद्याची वाफ घेतल्यानंतर तुमचा रेस्पिरेटरी सिस्टम चालू होते आणि कफ पातळ होण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला गरम पाण्यात कांद्याचे तुकडे टाकावे लागतील. हे पाणी चांगलं उकळू द्यावे. वाफ निघण्यास सुरुवात झाल्यास ५ मिनिटे वाफ घ्या.
  • कांद्याचे तुकडे घ्या. त्यामध्ये काळी मिर्ची टाका. चवीनुसार मिठ मिसळा. हे मिश्रण पाण्यात टाकून उकळा. त्यानंतर थंड झाल्यानंतर याचं सेवन करा.
  • सर्दी खोकल्यापासून सुटका पाहिजे असल्यास कांद्याचा रसही पिऊ शकता. जर तुम्ही कांद्याचा रस पिऊ शकत नसाल तर यामध्ये लिंबू आणि मध मिसळा. या रसाला चव येईल.

महत्वाच्या बातम्या –