Share

शेवग्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्की वाचा!

Published On: 

शेवग्याच्या शेंगा आपल्या सगळ्यांना माहित आहे. शेंगा कापून त्याची भाजी केली जाते. शेवग्याच्या शेंगा सांबरात किंवा आमटी मध्ये वापरू शकतो. तसेच शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. या भाजीमध्ये औषधी गुणधर्म आहेत.

शेवग्याची पान, फुल, साल, बिया, मूळ व खोड हे सगळे औषधी आहे. शेवगा अनेक आजारांवर औषधी आहे. शेवग्याच्या बियांच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती अधिक बळकट होते. यामध्ये असलेले क जीवनसत्व शरीराचे अनेक तऱ्हेच्या जंतूंच्या संक्रमणापासून दूर ठेवते.

शेवग्याच्या पानांच्या भाजी करून गरोदर महिलांना दिल्याने बाळंतपणात दुध ही भरपूर येते. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण झालेले अडथळे दूर करण्यास सक्षम असलेले पोटॅशियम शेवग्याच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात असल्याने याच्या नियमित सेवनाने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील ‘ब्लॉकेज’चा धोका टाळला जाऊ शकतो.

त्वचेवर काळे डाग, त्वचेचे विकार झाले असले तर शेवग्याच्या पानांच्या रसामध्ये लिंबाचा रस मिक्स करून ते चेहऱ्यावर लावल्याने आणि चोळल्याने त्वचा तेज बनते व त्वचा मुलायम बनते. उत्तम त्वचा आणि सुंदर केस हवे असल्यास आहाराध्ये नियमित शेवग्याच्या बियांचा समावेश करण्याचा सल्ला आहारतज्ञ देत असतात.

महत्वाच्या बातम्या – 

आरोग्य बातम्या (Main News) विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या