ऊसाच्या रसाचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा तुम्ही सूर्याच्या किरणांमुळे कंटाळता त्यावेळी तुम्ही तातडीने बूस्ट एनर्जी शोधता. काही लोक यासाठी शीतपेयांचे सेवन करतात, परंतु आरोग्यासाठी ते फायद्याचे नसतात. जर आपल्याला या परिस्थितीत ताजेतवाने आणि निरोगी रहायचे असेल तर उसाचा रस (sugarcane juice) प्या. हे केवळ ताजेपणा आणत नाही तर आपल्या शरीरात ऊर्जा संक्रमित करते. त्यात लोह, मॅग्नेशियम कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस असते. ज्याची आपल्या शरीराला आवश्यकता आहे.

  • ऊसाचा रस (sugarcane juice) तुम्हांला तुमची किडनी चांगली ठेवण्यासाठी मदत करते. ऊसाचा रस प्यायल्याने लघवी ही साफ होते. त्यामुळे मूतखडासारखे आजार होत नाहीत.
  • ऊसाचा रस लिव्हरसाठी खूप लाभदायक असतो. काविळ झालेल्या रुग्णांनी देखील ऊसाचा रस प्यायल्यास आराम मिळतो.  ऊसाचा रस शरीरातल्या अनावश्यक गोष्टी बाहेर काढण्यासाठी मदत करतो.
  • ऊसाच्या रसात कार्बोहाड्रेट, प्रोटीन, आर्यन आणि पोटॅशियम असल्याने शरीरासाठी ते फायदेशीर ठरतात. ऊसाचा रस सारखा प्यायल्याने शरीर मजबूत होते आणि कार्यक्षमतेतही वाढ होते.
  • ऊसाच्या रसात मोठ्याप्रमाणात खनिज पदार्थ असतात. त्यामुळे रस प्यायल्याने दात मजबूत होतात आणि तोंडातली दुर्गंधीही दूर होते.
  • ऊसाचा रस खोकला, दमा, मुत्ररोग आणि किडनीशी संबधित रोगांवरदेखील फायदेशीर आहे.
  • ऊसाचा रस कावीळ या रोगांवर अत्यंत गुणकारी आहे. कावीळ होऊ नये म्हणून ऊसाचा रस नेहमी पिणे फायदेशीर आहे.

महत्वाच्या बातम्या –