सर्दी-खोकला बरा करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे प्रचंड उष्णतामानामुळे हैराण झालेल्यांना जरा दिलासा मिळाला असला तरी, बदललेल्या या वातावरणामुळे अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झाला आहे. कोणत्याही डॉक्टरकडे न जाता हा त्रास जर तुम्हाला घरच्या घरी बरा करायचा असेल तर जाणून घ्या उपाय…

  • लसूण सर्दी-खोकल्याशी लढण्यात मदत करतं. लसणात एलिसिन नावाचं एक रसायन असतं जे अँटी बॅक्टेरियल, अँटी वायरल आणि अँटी फंगल असतं. लसणाच्या पाच कळ्या तुपात भाजून खाव्या. असं एक-दोन वेळ्या केल्यानं आराम मिळतो. सर्दी-खोकल्याचं संक्रमण लसून झपाट्यानं दूर करतं.
  • आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं छान बारीक करून घ्यावं आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं.
  • गरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त ठरतो. हळद अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरिअल असते, जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते.
  • लिंबू आणि मधाचा वापर सर्दी-खोकल्या उपयुक्त ठरतो. दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दूधात मिसळून प्यावं, खूप फायदा होतो.

महत्वाच्या बातम्या –