तुम्हाला काळी मिरीचे हे आश्चर्यकारक फायदे माहित आहेत का, तर मग घ्या जाणून काय आहेत ते……

काळी मिरी मसाले पिकांचा राजा असे संबोधले जाते. भारतात तयार होणा-या काळी मिरीस चांगला वास व उत्‍कृष्‍ट दर्जा असल्‍यामुळे जाग‍तिक काळी मिरीच्‍या 90 टक्‍के निर्यात एकटया भारतातून होते. तसेच भारतात विविध मसाले पिकांपासून मिळणाऱ्या एकुण परकीय चलनापैकी 70 टक्‍के परकीय चलन एकटया काळ्या मिरीपासून मिळते. मिरीला काळे सोने या नावाने ओळखले जाते.

काळी मिरी जगप्रसिद्ध भारतीय मसाल्यांपैकी एक आहे आणि भारतीय आहारात तिचा आवर्जून वापर केला जातो. मात्र या काळी मिरीचे आरोग्याला अनेक फायदे देखील आहेत. तसेच दक्षिण भारतात उत्तम प्रतीची मिरी तयार होते. कोमट पाण्यामध्ये काळी मिरी टाकून प्यायल्यास आरोग्याला त्याचा लाभ होतो. त्याचप्रमाणे अँटिऑक्सिडेन्ट आणि अँटीमायक्रोबीयल (antimicrobia) गुणधर्मांनयुक्त असा हा मसाल्याचा पदार्थ ट्युमरच्या वाढीला नियंत्रित करतो. आहारशास्त्रानुसार असेही सांगितले जाते की काळी मिरी हि फक्त पदार्थाची चव वाढवण्यासाठी नसून आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण सर्वानी या काळी मिरीचा वापर करायलाच हवा. चला तर मग आज आपण याची सुद्धा माहिती जाणून घेऊयात…..

  • पचनशक्ती वाढवते – काळी मिरी टेस्ट बड्स उत्तेजित करते आणि पोटामध्ये हायड्रोक्लोरिक असिडचा स्रावदेखील वाढवते. त्यामुळे उत्कृष्ट आणि पचनक्रिया चांगली होण्यासाठी मदत मिळते. पचनाच्या सुधाराव्यतिरिक्त काळ्या मिरीमुळे पोटात सूज, पोट फुगणं, अपचन, पोटातील गॅस आणि बद्धकोष्ठ या सगळ्या समस्यांपासूनही काळी मिरी सुटका मिळवून देते.
  • सर्दी खोकल्यावर उपयुक्त – सर्दी, खोकल्याने त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी काळी मिरी अतिशय उपयुक्त उपाय ठरते. आयुर्वेदात काळ्या मिरीच्या सेवनाने सर्दी आणि खोकला ठीक होऊ शकतो सेही सांगितले गेले आहे. म्हणून ज्या लोकांना सर्दी आणि खोकल्याची समस्या आहे त्यांनी मधासोबत काळ्या मिरीच्या पावडरचे सेवन करावे. याचा परिणाम लवकरच दिसून तुम्हाला सर्दी आणि खोकल्यापासून अवश्य आराम मिळेल. त्यामुळे आता पुन्हा कधी सर्दी खोकला झाल्यास आवर्जून काळ्या मिरीचा हा उपाय ट्राय करून पहा.
  • गॅस आणि अॅसिडिटीपासून सुटका – काही लोकांना बऱ्याचदा पोटामध्ये गॅस निर्माण होणं अथवा अॅसिडिटीचा सतत त्रास होत असतो. तुम्हालादेखील असा त्रास असेल तर लिंबाच्या रसामध्ये काळं मीठ आणि काळी मिरी पावडर घालून तुम्ही चिमूटभर खा. तुम्हाला या त्रासापासून लवकरात लवकर सुटका मिळेल.
  • त्वचेचे आजार होतात दूर – काळ्या मिरीमुळे विटीलिगो अर्थात त्वचा रोग, चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि त्वचेसंबंधी अन्य समस्यादेखील दूर होतात.
  • हृदय रोगाचा धोका कमी होईल – कोलेस्ट्रॉल लेव्हल संतुलित करण्याचा गुणधर्म काळ्या मिरीमध्ये आढळतो. हा गुणधर्म हृदय रोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करतो. त्यामुळे हृदय रोगाची समस्या असणाऱ्यांनी अवश्य काळ्या मिरीचे सेवन करा.

महत्वाच्या बातम्या –