काळे ओठ गुलाबी करण्यासाठी हे आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या

काळे ओठ गुलाबी

सगळ्यांना आपले ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे सुंदर हवे हवेसे वाटतात, परंतू अनेक लोकं ओठांच्या काळपटपणामुळे परेशान राहतात. लिप बाम आणि मॉइस्चराइजर ओठांना नमी तर देतं परंतू काळपटपणा काही दूर होत नाही. चला तर मग जणून घेऊ घरगुती उपाय…

  • गुलाबी गुलाबाच्या पाकळ्या घेऊन त्या दुधात घालाव्यात आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट ओठावर लाऊन काही वेळ तशीच ठेवा. दूध तुमच्या ओठांचा काळेपणा दूर करण्यास मदत करतं. तर गुलाबाच्या पाकळ्यांमुळे तुमचे ओठ गुलाबी आणि आकर्षक दिसण्यास मदत होते.
  • स्ट्रॉबेरी मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्या. या पेस्टमध्ये नारळाचे तेल मिक्स करून मिश्रण फ्रिजमध्ये ठेवून द्या. गरजेनुसार लिप बामचा वापर करा. थंडीमध्ये कोरड्या आणि फाटलेल्या ओठांवर उपाय म्हणून स्ट्रॉबेरी लिप बामचा वापर करा.
  • बिटाचा रस काढल्यानंतर एका वाटीमध्ये तो गाळून घ्या. यानंतर बिटाच्या रसामध्ये तूप मिक्स करा. हे मिश्रण छोट्या डबीमध्ये साठवून ठेवा. लिप बामप्रमाणे या मिश्रणाचा वापर करा.
  • एक चमचा दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट तुम्ही तुमच्या ओठांना लावा आणि पाच मिनिट्स तसंच राहू द्या. हळदीमध्ये असणाऱ्या अँटिसेप्टिक गुणांमुळे ओठ गुलाबी होण्यासाठी मदत मिळते
  • ऑलिव्ह ऑईलचे 2-3 थेंब रोज ओठाला लावा. त्यामुळे तुमच्या ओठांचा काळेपणा कमी होईल आणि तुमच्या ओठांना हवा असणारा ओलावादेखील मिळेल.

महत्वाच्या बातम्या –