‘खजूर’ खाल्याने टाळू शकता हे आजार!

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.या वनस्पतीची फळे खाण्यासाठी वापरतात.पिवळट तपकिरी रंगाचे हे बोरासारखे दिसणारे व थोडेसे लांबट फळ असते. एका फळात एकच बी असून तिच्या भोवतीच्या गरात ६० ते ७० टक्के साखर असते.खजूर लवकर आंबू लागतो,म्हणून खजुराची फळे कडक उन्हात सुकवतात. खजूर सुकवताना त्याचे ३५ टक्के वजन कमी होते.

राज्यातील ऊसटंचाईचा कामगारांच्या रोजगारावर होणार परिणाम

खजुरात शरीरास पोषक अशी द्रव्ये भरपूर आहेत. ग्लुकोज व फ्रुक्टोज स्वरूपातील साखर त्यातून मिळते.खारीक खाल्ल्यास शरीराला विविध फायदे होतात. विशिष्ट जातीचा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते. संस्कृत; तसेच हिंदीत खर्जुरी, मराठीत खारीक, तर इंग्रजीत ड्राय डेट असे म्हणतात.

पपई लागवड- कमी खर्चात भरपूर नफा

तसेच खजूर मेंदूची उत्तेजना थांबवून नाडीसंस्थेला बळ देतो. चक्कर येणं, भ्रम, मस्तिष्क, दौर्बल्य, पाठदुखी, कंबरदुखी या तक्रारीवर उपयुक्त आहे. अतिमद्यपानानंतर दुसर्‍या दिवशी येणार्‍या हँगओव्हरवर उपाय म्हणून खजूर खायला द्यावा.- रक्तातील लोहाचं प्रमाण कमी झालं असता थकवा येणं, धाप लागणं, चक्कर येणं, भोवळ येणं, छातीत धडधड होणं अशावेळी खजूर खाल्ल्यानं तक्रारी कमी होतात आणि हृदयाला बळ मिळतं. चला तर मग जाणून घेऊयात खजूर खाल्याने कुठले आजार टाळता येतात.

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खायला हवा चिकू !

शरीराला ऊर्जा मिळते – खजुरात व्हिटॅमिन ए, बी १, बी२, बी ३,बी ५ आणि व्हिटॅमिन सी अशी जीवन सत्व असतात. खजूर खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच आपला थकवा दूर होतो.

पचनशक्ती चांगली राहते – सतत पोट फुगणे तसेच अपचन होणे अशा समस्या ज्यांना आहेत, त्यांच्यासाठी खजूर खाणे खूप लाभदायी आहे. खजूरमध्ये फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया एकदम चांगली राहते. २-३ खजूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. आणि ते सकाळी खा. यामुळे पचनक्रिया चांगली राहते.

भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा तपासणी यंत्रणा सक्षम नाही

रक्त वाढीसाठी उपयुक्त –  खचूर खाण्यामुळे आपल्या शरीराला पुरेसे लोह प्राप्त होते. ज्या मुलांना अॅनिमिया आहे त्यांच्यासाठी खजूर फायद्याचे आहेत. तुमच्या मुलाच्या छातीत दुखत असेल खजूर खाल्याने त्रास कमी होण्यास मदत होते.

मज्जासंस्था अधिक मजबूत – खजुरामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. यामध्ये सोडियमदेखील असते. ही दोन्ही पोषक द्रव्ये मज्जासंस्था योग्यरित्या कामरकरण्यासाठी मदत करतात. यामुळे आपल्या मेंदूचा विकास होतो.

महत्वाच्या बातम्या –

शेती करताना जैवसाखळी जपली जावी, मिओरा यांचे वक्तव्य

चिकू महोत्सवाला सुमारे सव्वा लाख नागरिकांची उपस्थिती

रात्री केस धुवत असाल तर सावधान