राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल ‘इतक्या’ रुग्णांनी केली कोरोनावर मात

कोरोना

मुंबई – राज्यात गेल्या 24 तासांत 848 नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात 50 रुग्णांच्या कोरोनाबाधिता मृत्यूची नोंद झालीय. तर राज्यात गेल्या २४ तासात 987 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 64 लाख 79 हजार 396 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात चांगली वाढ झाली आहे. तर  राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 97.68 टक्क्यांवर पोहचलंय. राज्यात सध्या 9 हजार 187 रुग्ण सक्रीय आहेत.

तर सध्या राज्यातील मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे. तर आतापर्यंत राज्यात तब्बलसहा कोटी 50 लाख 47 हजार 491 जणांची कोरोना चाचणी करण्यात आलीय. त्यापैकी 66 लाख 33 हजार 105 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. तर सध्या राज्यात सध्या 90 हजार 538 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, 1 हजार 65 रुग्ण वैद्यकीय संस्थेत उपचार घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या –