गरम पाण्‍यात हिंग टाकून रोज पिल्‍यास होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

भारतीय जेवणात स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी हिंगाची फोडणी दिले जाते. हिंगाचा सुवास तेज आणि जेवण्याची इच्छा जागृत करणारा असतो. आयुर्वेदात देखील याचे अनेक फायदे सांगितले गेले आहेत. आपण दररोज चिमूटभर हिंग वापराल तर अनेक आजारांपासून मुक्ती मिळू शकेल. हिंग पोट, लिव्हर आणि डोळ्यासाठी फायदेशीर ठरतं. चला तर जाणून घेऊ फायदे…..

  • ज्यांना पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात लगेच सर्दी होते त्यांनी हिंगपाणी प्यावे. त्यामुळे श्वसनाच्या तक्रारी दूर होतात आणि सर्दी होण्यापासून बचाव होतो.
  • रक्तात गुठळ्या तयार होण्यापासून रोखणारे घटक हिंगामध्ये असतात. त्याचबरोबर शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास हिंगाची मदत होते. त्यातून पुढे रक्तदाब नियंत्रणास उपयोग होतो. जर पाण्यातून घ्यायचा नसेल तर तुम्ही ताकातूनही हिंगाचे सेवन करू शकता. रिकाम्यापोटी हिंगपाणी घेतल्यास अधिक प्रभावी ठरते.
  • हिंगात रक्त पातळ करण्याचे गुण असतात. म्हणून हे ब्लड प्रेशरच्या आजाराने त्रस्त लोकांसाठी फायदेशीर आहे. याने नसांमध्ये बल्ड क्लॉटिंग सारखी समस्या होत नाही ज्याने ब्लड प्रेशर अनियंत्रित होण्यापासून मुक्ती मिळते.
  • हिंगामुळे जळजळ किंवा पित्त कमी होत असल्याने डोकेदुखीवर ते उपकारक ठरते. डोक्याकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील जळजळ कमी होत असल्याने डोकेदुखीपासून आराम मिळण्यासाठी हिंगपाणी प्यावे.
  • हिंगात शरीरातील आंतरिक सूज कमी करण्याची क्षमता असते. साधारणात डोक्यातील आर्ट्रिजध्ये सूज असल्यामुळे डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. अशात रोज हिंगाचे सेवन केल्याने डोकेदुखीपासून मुक्ती मिळू शकते. डोकेदुखीचे प्रमाण अधिक असल्यास एका ग्लासात 2 चिमूट हिंग उकळून घ्या. कोमट झाल्यावर दिवसातून दोनदा प्यावे.

महत्वाच्या बातम्या –