तेलकट त्वचेसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

प्रत्येकाला आपली त्वचा सुंदर दिसायला हवी असते. त्वचा चांगली दिसण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही उत्पादन वापरून अथवा घरगुती उपाय करून प्रयत्न करत असतो. प्रत्येकाची त्वचा ही वेगळी असते. काही जणांची त्वचा कोरडी असते तर काही जणांची त्वचा ही तेलकट असते. तेलकट त्वचेमध्ये तुमच्या चेहऱ्यावर सतत थोड्या वेळाने तेल जमा होत राहतं. त्यामुळे त्वचेला जास्त त्रास होतो. त्यावर पुळ्या येणं अथवा सतत चेहरा तेलकट दिसणं यासारख्या समस्या उद्भवतात. तेलकट त्वचा ही महिलांसाठी खूप मोठी समस्या आहे. चला तर जाणून घेऊ उपाय…

  • तेलकट त्वचेसाठी तेलकटपणाचा घटक नसलेले मॉईश्चरायझर वापरल्यास त्याचा फायदा होतो. ज्या मॉईश्चरायझरमध्ये व्हीटॅमिन ई जास्त प्रमाणात असते असे मॉईश्चरायझर वापरावे. यामुळे चेहऱ्यावर तेलकट घटकांची निर्मिती होण्यापासून तुमची सुटका होईल.
  • जास्तीत जास्त पाणी पिणे चांगल्या त्वचेसाठी अत्यावश्यक असते. थंडीच्या दिवसात कमी पाणी प्यायले जाते. मात्र त्यामुळे त्वचा जास्त कोरडी आणि निस्तेज होते. पण पाण्याचे प्रमाण जास्त ठेवल्यास त्वचा तजेलदार दिसण्यास मदत होते.
  • चेहऱ्यावरील तेलकटपणा निघून जाण्यासाठी चेहरा दिवसातून दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुणे आवश्यक असते. विशेषत: थंडीच्या दिवसात हा तेलकटपणा कमी होतो त्यामुळे त्वचा कोरडी दिसायला लागते. अशावेळी क्रीम असलेले फेसवॉश वापरून चेहरा धुतल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.

महत्वाच्या बातम्या –