Share

सावधान! जिमला जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टींच सेवन टाळा; या गोष्टी शरिरासाठी घातक

Published On: 

वर्कआऊटचे लवकर आणि अगदी योग्य पद्धतीने फायदे व्हावेत यासाठी बॅलेन्स डाएट खूप महत्वाचा असतो. तसेच यासोबतच पुरेसा आराम देखील तेवढाच महत्वाचा आहे. जिम केल्यानंतर डाएट जेवढं महत्वाचं आहे तितकचं महत्वाचं त्याची सुरूवात देखील आहे. आपल्यापैकी अनेकजण जिमला जाण्याअगोदर शेक, फ्रूट ज्यूस किंवा ड्रिंक्स पितात ज्यामुळे एनर्जी मिळते. मात्र या गोष्टी शरिरासाठी घातक आहेत. जिमला जाण्यापूर्वी या गोष्टींच सेवन अवश्य टाळा.

गोड फ्रूट ड्रिंक्स 

वर्कआऊटच्या अगोदर फळ खाणं अतिशय फायदेशीर असतात तिथेच फ्रूट ड्रिंक्स पिणं घातक असतं. या ड्रिंक्समध्ये अनेक प्रकारची साखर आणि इतर द्रव्य असतात. जे शरीरासाठी घातक असतात.

कार्बोनेटेड ड्रिंक्स 

अल्कोहलसारख्या कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये सर्वाधिक साखर आणि दुसरे असे पदार्थ जे शरिराला घातक असतात. यामुळे तुम्हाला नुकसना होऊ शकतो.

अल्कोहोल 

अल्कोहोल प्यायल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे तुमच्या शरीरातील ऍनर्जी देखील नष्ट होते.

स्पोर्ट्स ड्रिंक 

जिममध्ये जाण्याअगोदर स्पोर्ट्स ड्रिंक पिणं तुम्हाला हानी पोहोचवू शकतात. यामध्ये देखील साखरेचे प्रमाण देखील सर्वाधिक असते. याचा परिणाम तुमच्या मेटाबायोलॉजीवर होऊ शकतो.

कॅफीन आणि निकोटीन ड्रिंक्स 

कॅफीन आणि निकोटीन शरिरातील ब्लड फ्लोची प्रक्रिया कमी करतात. जेव्हा तुम्ही जिममध्ये वर्कआऊटकरता जाता तेव्हा ऑक्सिजन सप्लाय बॅलेन्स करण्याकरता जोरात पंप करणं गरजेचं असते.

महत्वाच्या बातम्या – 

आरोग्य बातम्या (Main News) विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या