सावधान! टोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्याने होतील ‘या’ समस्या!

अनेकजण टोमॅटो आणि काकडी एकत्र सलाद म्हणून अनेकदा जेवणासोबत खातात. पण कदाचित तुम्हाला माहिती नसेल की, टोमॅटो आणि काकडी खाणे जितके फायद्याचे आहे तितकेच ते एकत्र खाणे धोकादायक आहे. टोमॅटो आणि काकडी एकत्र खाणे पोटाच्या विकारांना आमंत्रण देऊ शकतं. टोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्ल्याने गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, मळमळ होणे, थकवा आणि अपचन या समस्या होऊ शकतात.

काय आहे असे होण्याचे कारण? चला जाणून घेऊ 

काकडी आणि टोमॅटो दोन्हीही विरूद्धा आहार सूचीत येतात. या सूचीत असण्याचा अर्थ दोन्ही फळं ऎकमेकांच्या विपरित असतात. हे दोन्ही फळं पोटात पचण्याच्या वेगवेगळ्या वेळा असतात. त्यामुळे पोटात या दोन्हीमुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

का होतात या समस्या? चला जाणून घेऊ 

टोमॅटो आणि काकडी दोघांचंही नेचर वेगळं आहे. एक लवकरच डायजेस्ट होतं तर दुसरं हळूहळू. त्यामुळे दोन्ही विपरित डायजेशन असलेल्या फळभाज्या एकत्र खाणं समस्या निर्माण करू शकतात. कारण एक पचल्यावर इंटेस्टाइनमध्ये जातं आणि दुस-याची डायजेशन प्रक्रिया सुरूच असते. यामुळे शरिरात ताठरता जाणवते. अशाप्रकारचा त्रास होणे संपूर्ण शरिरासाठी हानिकारक होऊ शकतं.

तसेच दूध आणि केळी

असंच दूध आणि केळी बाबत सांगता येईल. ब-याचदा दूध आणि केळी एकत्र खाण्याचा सल्ला दिला जातो. पण वास्तव खूप वेगळं आहे. जेव्हा या दोन गोष्ट एकत्र झाल्यावर ऎकमेकांना पचण्यापासून रोखतात. दोन्ही गोष्टींचा पचण्याचा वेळ वेगळा आहे. लागोपाठ दूध आणि केळी एकत्र खाल्ल्याने शरीराची पचनशक्ती कमजोर होऊ शकते. यासोबत झोप न येणे अशीही समस्या उद्भवते.

ब्रेड आणि नूडल्ससोबत ज्यूस

ब्रेड आणि नूडल्ससोबत ऑरेन्ज ज्यूस पिल्याने गरजेचं एंजाइम संपुष्टात येतं. ज्यामुळे पोटाचे वेगवेगळे आजार होऊ शकतात. याने डायजेशनची समस्याही निर्माण होते.

महत्वाच्या बातम्या –