‘हे’ आहे जगातील सर्वात शक्तिशाली फळ, जाणून घ्या फायदे

किवी हे बहुगुणी फळ आहे. याचा आकार साधारण कोंबडीच्या अंडयाऐवढा लांबीला असतो.या फळात शरीराकरता लागणारे लाभदायक फायबर भरपुर मात्रेत असतात. किवी हे फळ आतुन खुप मऊ आणि चवीला गोड असतं परंतु या किवी ची चव अन्य फळांपेक्षा खुप वेगळी असते. वेगळया चवीकरता सुध्दा किवी प्रसिध्द आहे. ब.याच देशांमध्ये याची शेती केली जाते, जसे इटली, न्युझीलेण्ड, चिली, ग्रीस आणि फ्रांस. किवी या फळाच्या सेवनामुळे श्वसनाचे विकार मुख्यत: रात्री येणारा खोकला, श्वासात येणारे अडथळे इत्यादी दूर होण्यास मदत होते.

हे आहेत फायदे

  • किवीमधील पोषक तत्वे डिप्रेशन दूर करण्यास मदत करतात.
  •  हृदयाचे आरोग्य राखण्यासाठीही किवीचा फायदा होतो.
  • किवीमध्ये नैसर्गिकरित्या रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असलेल्यांसाठी हे फळ उपयुक्त आहे.
  • किवी फळ खाल्ल्यानं ब्लड शुगर कमी होतं. तसेच दिवसभरातील थकवा दूर होतो.
  • फळाचा आतला भाग जितका गुणकारी आहे तितकीच या फळाची साल सुद्धा गुणकारी आहे. हे फळ डायबिटीजच्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त असते.
  • पचनक्रिया सुधारण्यासही किवी गुणकारी ठरते.
  • किवीचा उपयोग शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी होतो.

महत्वाच्या बातम्या –