Neem Oil | केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Neem Oil | टीम कृषीनामा: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि पोषक आहाराचा भावामुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती केसांच्या समस्येपासून त्रस्त आहेत. केस गळती, कोंडा, कोरडे केस इत्यादी समस्या केसांचे आरोग्य बिघडवतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय शोधत असतात. यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले महागडे उत्पादन वापरतात. मात्र ही उत्पादन केसांना दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. केसांना दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या तेलाचा वापर करू शकतात. या तेलामध्ये अँटी फंगल आणि अँटीस्पेक्टिक गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. कडुलिंबाच्या तेलाचा पुढील प्रमाणे वापर केल्याने केस निरोगी राहू शकतात.

खोबरेल तेल आणि कडुलिंबाचे तेल (Coconut Oil and Neem Oil for Hair Care)

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या तेलामध्ये खोबरेल तेल मिसळू शकतात. यासाठी तुम्हाला दोन्ही तेल समान प्रमाणात घेऊन व्यवस्थित मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे तेल कोमट करून हलक्या हाताने केसांना मसाज करावी लागेल. मसाज झाल्यानंतर तुम्हाला हे तेल अर्धा तास केसांवर राहू द्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची केस नियमित शाम्पूने धुवावे लागतील. नियमित या तेलाचा वापर केल्याने केसांची चमक वाढेल आणि केस मजबूत होतील.

कडुलिंबाचे तेल आणि मध (Honey and Neem Oil for Hair Care)

केसांची गळती थांबवण्यासाठी कडुलिंबाचे तेल आणि मध उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये केसांच्या लांबीनुसार कडुलिंबाचे तेल घेऊन त्यामध्ये एक चमचा मध मिसळून घ्यावा  लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला व्यवस्थित केसांना लावावे लागेल. साधारण अर्धा तासानंतर तुम्हाला तुमचे केस कोमट पाण्याने धुवावे लागतील. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने केस गळतीची समस्या कमी होऊ शकते.

कडुलिंबाचे तेल आणि कापूर (Camphor and Neem Oil for Hair Care)

केसांमध्ये खाज किंवा कोंड्याची समस्या निर्माण झाली असेल तर तुमच्यासाठी कडुलिंब आणि कापूर उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला कडुलिंबाच्या तेलामध्ये कापूर मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला डोक्याला लावून हलक्या हाताने मसाज करावी लागेल. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हे मिश्रण केसांना लावू शकतात. या मिश्रणाच्या उपयोगाने केसांतील कोंडा कमी होऊ शकतो.

वरील गोष्टींसोबतच केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पुढील ज्यूसचा समावेश करू शकतात

कोरफडीचा ज्यूस (Aloevera juice for Hair Care)

कोरफडीच्या ज्यूसचे नियमित सेवन केल्याने केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. कारण यामध्ये विटामिन सी, विटामिन ई, बीटा केरोटीन यासारखी पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळून येतात. कोरफडीच्या रसाचे नियमित सेवन केल्याने तुमचे केस मजबूत होऊन त्यांची चमक वाढण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर या रसाचे नियमित सेवन केल्याने तुमच्या शरीरामध्ये दिवसभर ऊर्जा राहते.

किवी ज्यूस (Kiwi juice for Hair Care)

किवीचा ज्यूस प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. कारण यामध्ये माफक प्रमाणात विटामिन ई आणि इतर पोषक घटक आढळून येतात. हे पोषक घटक केसांना दाट आणि मजबूत बनवण्यास मदत करतात. त्याचबरोबर या रसाचे नियमित सेवनाने तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.

आवळा ज्यूस (Amla juice for Hair Care)

आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. कारण आवळ्यामध्ये असलेले गुणधर्म आणि पोषक तत्वे गंभीर आजाराच्या समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. आवळ्याच्या ज्यूसचे नियमित सेवन केल्याने केस गळतीची समस्या दूर होऊ शकते. केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी तुम्ही नियमित आवळ्याच्या रसाचे सेवन करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Beetroot Peels Benefits | चेहऱ्याच्या ‘या’ समस्यांवर रामबाण उपाय आहे बीटाची साल, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

Job Opportunity | इन्कम टॅक्स विभागात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Curry Leaves | कढीपत्त्याच्या रसाचे सेवन केल्याने केसांना मिळू शकतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Diet For Dry Skin | कोरड्या आणि निर्जीव त्वचेच्या समस्येपासून त्रस्त आहात? तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश