कोबीच्या भाजीमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, जाणून घ्या

कोबी ही पालेभाजी असून िहदीमध्ये बंद गोभी इंग्रजीमध्ये कॅबेज, शास्त्रीय भाषेमध्ये ब्रासिका ओलेरासिया या नावाने ओळखली जाते. कोबीला पानांवर पाने चिकटलेली असल्यामुळे शतपर्वा असेही म्हणतात. कोबी हा क्रुसिफेरी या कुळातील आहे. कोबी ही भाजी पूर्वी भारतात प्रचलित नव्हती युरोपीय लोकांनी ही भारतात आणली. भारतात कोबीचे पीक सर्वत्र घेतले जाते. सहसा हिवाळी पीक म्हणून त्याच्या बी पासून रोपे तयार करून लागवड केली जाते. पांढरट-हिरवा व लाल जांभळा अशा दोन प्रकारच्या कोबीच्या जाती आहेत. जाणून घ्या फायदे…

  • कोबीमध्ये अँटिऑक्सिडंट, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे प्रमाण अधिक असते. पत्ताकोबीचे रोज सेवन केल्यास सी जीवनसत्त्वाची ५० टक्के गरज पूर्ण केली जाऊ शकते.
  • कोबीमुळे मज्जातंतू आणि मेंदूचे काम व्यवस्थित राहते.
  • पचनक्रिया सुरळीत राहते.
  • कोबीमध्ये अ जीवनसत्तव, व्हिटॅमिन सी यांचं पुरेपूर प्रमाण असतं. त्यामुळे कोबी हा शरीरासाठी आरोग्यकारी आहे. कोबीमुळे आतड्याचा कर्गरोग नियंत्रित राहू शकतो.
  • कोबीच्या भाजीमुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

महत्वाच्या बातम्या –