आपल्या दररोजच्या जेवनामध्ये दह्याचा समावेश असतोच. दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्यासंबधी दही खाणं हा उपाय उत्तम आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते. तसेच गुळामध्ये लोह भरपूर प्रमाणात आढळते. गुळाचे तर खूप फायदे आहेत. याअगोदरही आम्ही तुमहाला गुळाचे फायदे सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे दह्यामध्ये गुळ मिसळून खाल्याने अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत. यामुळे कुठले फायदे होतात चला तर जाणून घेऊयात…….
चला तर मग पाहुयात काय आहेत दही आणि गुळाचे फायदे……..
- पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत
गुळामध्ये असलेल्या पोषणतत्वामुळे पचन प्रक्रियेसंदर्भातील आजार सुधारण्यास मदत होते. गुळामुळे पचन प्रक्रिया सुलभरित्या होते व पोटामध्ये गॅस निर्माण होत नाहीत. विशेषकरुन हिवाळ्याच्या दिवसांत होणा-या पोटाच्या समस्या गुळ व दह्यानं कमी होतात. दररोज दही आणि गुळाचं सेवन केल्यास पोटाचे विकार दूर होतील.
- सर्दी-खोकला होईल दूर
पावसाळा सुरु झाल्यावर किंवा दररोजच्या पाण्यात बदल झाल्यास अनेकांना सर्दी अन् खोकला होतोच. गुळामध्ये असलेल्या मिनरल्स, लोहा, मॅग्नीशियम, पोटेशियम, कॅल्शियम, सेलेनियम, मँगनीज आणि कॉपरसारख्या तत्वामुळे अनेक आजार नाहीशे होतात. सर्दी-खोकल्याची समस्या असेल तर दही आणि गुळाच्या मिश्रणात काळी मिर्ची पावडर टाकून मिश्रण करा. हे सेवन केल्यास सर्दी अन् खोकला नाहिसा होईल.
- रक्ताची कमतरता दूर करते
जर शरीरात रक्ताची कमतरता असेल तर आपण दही आणि गूळ सेवन करू शकता. गूळ खाल्ल्याने शरीरात रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी मदत होते. म्हणून अशात, दही आणि गूळ आपल्यासाठी फायद्याचे ठरेल.
- वजन घटवण्यास मदत
मधाप्रमाणेच गुळही आपल्या आरोग्यास फायदेशीर आहे. कारण गुळ रासायनिक प्रक्रियांविना तयार केला जातो. यामुळे गुळ साखरेहून अधिक शरीरास पोषक आहे. यामुळेच दररोज धह्यासोबत गुळाचे सेवन करावे.
महत्वाच्या बातम्या –