आवळ्याचा रस पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

आवळा हे फळ गुणवत्तेमध्ये सर्व फळांमध्ये श्रेष्ठ आहे. आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहार आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करता येतो. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. िहदीमध्ये आँवला, संस्कृतमध्ये आमलकी, इंग्रजीमध्ये ‘एम्ब्लिका मायरोबेलान’ या नावाने परिचित आहे

उत्तर व दक्षिण भारतात आवळ्याचं उत्पादन घेतलं जातं.  गुजरातमध्ये पावागड, डांग आणि सापुतारा येथील जंगलात आवळ्याचे वृक्ष मोठय़ा प्रमाणात दिसून येतात. आवळ्याचे पांढरे आवळे व रान आवळे असे दोन प्रमुख प्रकार आहेत. सुकलेल्या आवळ्यापेक्षा हिरवा ताजा आवळा आधिक गुणकारी असतो.  आवळ्याचा छुंदा, मुरंबा, लोणचे, चटणी, अवलेह, कँडी, सरबत, सुपारी करून वर्षभर आवळा सेवन करता येतो. चला तर जाणून घेऊ आवळ्याचा रस पिण्याचे फायदे….

  • आवळ्याचा रस पिल्याने दात मजबूत आणि चमकदार होतात. आवळ्याच्या  रसात मोठ्या  प्रमाणात कॅल्शियम आहे. रोज आवळ्याचा रस पिल्याने हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.
  • आवळा रस पिल्याने केस लांब, जाड, चमकदार आणि काळे होतात. आवळा केसांना मजबूत बनविण्यात मदत करतो. आवळ्याचा रस केस पांढर्‍या होण्यापासून प्रतिबंधित करते.
  • आवळाच्या रसामध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट आढळतात. जे आपल्या चेहऱ्यावर वाढत्या वयाचा परिणाम होऊ देत नाही.आवळाच्या रसामध्ये मध मिसळल्याने चेहरा चमकदार होतो.
  • आवळ्याचा रस डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. रोज आवळा रस पिल्याने नजर तीक्ष्ण होते. तोंडात फोड आल्यास आवळ्याचा रस पिल्याने तोंडात फोड जाण्यास मदत मिळते.
  • आवळ्याच्या रसामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत. हे सर्व घटक आजारांपासून आपल्या शरीराचे रक्षण करतात. आवळ्याचा रस पिल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

महत्वाच्या बातम्या –