राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव; गेल्या २४ तासात ‘इतके’ रुग्ण आढळले

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातही या विषाणूने शिरकाव केला आहे. राज्यात सुरुवातीला या नव्या व्हेरिएंटचे २ रुग्ण आढळले. त्यानंतर सोमवारी(६ डिसें.)ओमायक्रॉनचा(Omicron) दहावा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.

सोमवारी मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले असून, दक्षिण आफ्रिकेतून २५ नोव्हेंबरला मुंबईत आलेल्या ३७ वर्षीय प्रवाशाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे २९ नोव्हें.ला आढळले होते. त्यामुळे त्याचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले. त्यामध्ये त्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णाच्या सहवासातील व्यक्तींचा शोध घेतला असता त्याच्याबरोबर राहिलेल्या ३६ वर्षीय मैत्रिणीलाही कोरोनाची लागण झाल्याचे ३० नोव्हेंबरला आढळले होते. ही महिला २५ नोव्हेंबरला अमेरिकेतून मुंबईत आली होती. तिलाही ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे जनुकीय कर्मनिर्धारणादरम्यान स्पष्ट झाले.

दरम्यान, शनिवारी डोंबिवलीत राज्यातील पहिला ओमायक्रॉन रुग्ण आढळला होता. त्यानंतर पिंपरीतील सहा आणि पुण्यातील एकाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले होते. आता अजून दोन रुग्णांची भर पडल्याने राज्यातील रुग्णसंख्या १० वर पोहोचली आहे.

महत्वाच्या बातम्या –