अनेक रोगांवर गुणकारी आहे ‘जेष्ठमध’, जाणून घ्या फायदे

जेष्ठमध

पुणे : ‘ज्येष्ठमध’ हे एक आयुर्वेदिक औषध आहे. त्याला यष्टीमधु असे ही म्हटले जाते. संगीत शिकणार्यासाठी ज्येष्ठमध कंठ सुधारक म्हणून उपयोग करते.घसा खराब झाला किंवा खोकला येत असला, तर ज्येष्ठमध चघळण्यास किंवा त्याचे चूर्ण मधासोबत घेण्यास सांगितले जात असे. पण ह्या शिवाही ज्येष्ठमधाचे अनेक फायदे आहेत.

कफ, पित्त आणि वात या तीन दोषांवर उपचारासाठी ज्येष्ठमध फार गुणकारी ठरते.डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी दररोज संध्याकाळी बडीशेपचे चूर्ण आणि जेष्ठमधाचे चूर्ण एकत्र करून खाल्याने उत्तम परिणाम पाहायला मिळतील.चवीला गोड असणारे ज्येष्ठमध कॅल्शियम, ग्लीसारायजक अॅसिड, अँटी ऑक्सिडंटस्, अँटी बायोटिक तत्वांनी परिपूर्ण आहे.

ज्येष्ठमधाच्या वापराने डोळ्यांशी निगडीत विकार, तोंड येणे, घसा खराब असणे, दम लागणे, हृदयरोग, तसेच जुन्या जखमांच्या उपचारामध्ये अतिशय चांगला गुण येतो. ह्या सर्व विकारांच्या उपचारांमध्ये ज्येष्ठमधाचा वापर गेली अनेक शतके केला जात आहे. ज्येष्ठ मध हे वात, कफ, पित्त दोषांना शमवून अनेक रोगांमध्ये रामबाण इलाज म्हणून सिद्ध झालेले आहे.

याशिवाय अशक्तपणा कमी करणारे म्हणजे शक्तिवर्धक असे हे ज्येष्ठमध चवीला गोडसर, पण कफ कमी करणारे बलवर्धक औषध आहे. रुग्णास अशक्तपणा आला असल्यास ज्येष्ठमधाचा तुकडा बारीक कुटून त्याचे वस्त्रगाळ चूर्ण, ४ ग्राम मध किंवा तुपातून दुपारी व रात्री जेवणापूर्वी त्यास खाण्यास द्यावे.

महत्वाच्या बातम्या –