ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यात पुन्हा निर्बंध

पुणे : उद्यापासून सुरु होणाऱ्या  पुण्यातील चित्रपट आणि नाट्य गृहात प्रेक्षकांच्या संख्येवर निर्बंध नसतील अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मात्र त्या घोषणेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच पुन्हा निर्बंध घालावे लागत आहेत. मायक्रॉन व्हेरियंटने (Omicron) च्या पार्श्वभूमीवर पुण्यातील चित्रपट आणि नाट्यगृहात सध्याच्या निर्बंधांनुसार 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश मिळणार आहे.

पुण्यातील खुल्या जागेतील कार्यक्रमांसाठी 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी असणार आहे. या निर्बंधांचा 2 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला फटका बसण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे नवे आदेश सोमवारी जारी केले आहेत. अजित पवार यांनी शनिवारी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये मनोरंजन क्षेत्राला दिलासा दिला होता. पण ही बैठक होताच काही वेळातच राज्य शासनाने नवे आदेश जाहीर केले आहेत.

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नव्याने लावण्यात आलेल्या निर्बंधांचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला याचा फटका बसणार आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळं संपूर्ण जग धास्तावलं आहे. याच पार्श्वभूमीवर निर्बंध लावपुण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी रात्री नव्याने आदेश जारी केले. चित्रपटगृह, नाट्यगृह, मंगल कार्यालय, सभागृह यासह इतर बंदीस्त जागेतील कोणत्याही कार्यक्रमासाठी जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –