तापावर ‘हे’ आहेत हक्काचे घरगुती उपाय ! जाणून घ्या

सध्या वातवरणात होत असलेल्या बदलामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत तापाचा त्रास जाणवत आहे. अशावेळी प्रत्येक वेळी डॉक्टरांकडील औषधांबरोबरच घरगुती उपाय देखील करावेत. यासाठी नेमकं काय करावं आणि कोणत्या गोष्टींचा समावेश करून घ्यावेत याविषयी खास तुमच्यासाठी ही माहिती.

काय आहेत हे घरगुती उपाय…

  • तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो
  • पुदिना आणि आल्याचा काढा कुठल्याही प्रकारच्या तापावर उपयुक्त ठरतो. त्यामध्ये मेथी आणि मध घालूनही आपण घेऊ शकतो.
  • तुळस घालून केलेला चहा प्यायल्यानेही ताप लवकर उतरतो.
  • आल्याचा चहा घेतल्यानेही आराम मिळतो. याने तापासोबत कफही निघून जाईल.
  • थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्लाने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो.
  • जर सर्दी, ताप, थंडी आणि अंग दुखत असेल तर दालचिनीचा तुकडा, सुंठीचा तुक़डा, लवंग, गवती चहा पाण्यात एकत्र करून दिवसातून दोन वेळा घेतल्याने ताप कमी होतो.
  • तापात बेलफळाचं चूर्ण उपयुक्त ठरतं. बेलफळाचं चूर्ण पाण्यात घालून ताप उतरेपर्यंत घ्यावं.
  • तापात मनुके खाणं उपयुक्त ठरतं. २० ते २५ मनुके पाण्यात भिजत घालावेत. ते कुस्करून त्यात लिंबाचा रस घालावा. हे दिवसांतून दोन वेळा घ्यावं.
  • तुळशीचा काढा : कपभर उकळत्या पाण्यामध्ये मूठभर ताजी तुळशीची पानं टाका. हे मिश्रण 5-10 मिनिटे उकळू द्या. ते गाळून दिवसातून दोनदा प्या. मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांसाठी हा काढा फायदेशीर ठरतो. यामुळे ताप कमी होतो.

महत्वाच्या बातम्या –