डाएटसाठी गाजर का महत्वाचं असत; गाजर खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

गाजर ही एक वनस्पती असून तिचे मूळ खाण्यासाठी वापरले जाते. गाजर चवीला गोड असते. गाजरामध्ये अ जीवनसत्व असते. डोळ्याच्या आरोग्यासाठी गाजर उपयुक्त असते. बहुधा गाजर ही वनस्पती चे मूळ पर्शियात आढळुन येते आणि त्याची लागवड मूळतः त्याची पाने आणि बियाण्यासाठी केली गेली. या झाडाचा सर्वात सामान्यपणे खाणारा भाग म्हणजे खाली जाणारे मुख मूळ (टॅप्रूट), जरी देठ आणि खाल्ली तर पाने सुद्धा.

गाजराच्या मुळांमध्ये अल्फा- आणि बीटा कॅरोटीनचे प्रमाण जास्त असते आणि ते व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन बी 6 चा चांगला स्रोत आहेत. नियमितपणे गाजर खाल्ल्याने जठरांमध्ये होणारा अल्सर आणि पचनाचे विकार टाळले जातात. गाजरामध्ये आम्ल घटक असतात जे शरीरातील आम्लाचे प्रमाण संतुलित करून रक्त शुद्ध करते. गाजरामध्ये पोटॅॅशियम असते जे रक्तदाब वाढवण्यास मदत करते. गाजर खाल्ल्यामुळे तोंडातील हानिकारक किटानुंचा नाश होतो आणि दात किडण्यापासून टाळता येतात. दररोजच्या जेवण्यात गाजराचं सेवन हे आरोग्य स्वस्थ ठेवण्यास मदत होते.

चला तर मग जाणून घेऊयात डाएटसाठी गाजर का महत्वाचं आहे ते……

  • गाजरामध्ये अ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असल्याने ते डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतं.
  • गाजर हे व्हिटॅमिन ए, सी आणि बी ६ चा स्त्रोत आहे. याच्या सेवनाने ब्रेस्ट कॅन्सर, कोलन कॅन्सर आणि फुफ्फुसांच्या समस्यांपासूनही बचाव होऊ शकतो.
  • गाजर खाणं केसांसाठीही फायदेशीर आहे. गाजर केस गळतीची समस्या कमी करण्यास मदत होते. तसंच केस लवकर वाढण्याचीही शक्यता असते.
  • गाजर नियमित खाल्ल्याने हाडांचं आणि स्नायूचं आरोग्य सुधारतं. तसेच त्वचेचं आणि केसांचं आरोग्यही चांगलं राहतं.
  • गाजर दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठीही परिणामकारक ठरतं. जेवणानंतर गाजर खाल्ल्याने दात स्वच्छ होतात.

महत्वाच्या बातम्या –