‘मेस्को’च्या अडचणींवर सकारात्मक मार्ग काढणार – दादाजी भुसे

दादाजी भुसे

मुंबई – महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाला (मेस्को) भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत सर्वांगिण विचार करुन सकारात्मक मार्ग काढला जाईल, असे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. मेस्कोने सुरक्षा सेवा उपलब्ध करुन दिलेल्या विविध विभागांकडे असणारी प्रलंबित आर्थिक येणी लवकरात लवकर मिळण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मेस्कोची वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच सुरक्षा रक्षक सेवेबाबतच्या विषयांवर मंत्रालयात मंत्री श्री.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सामान्य प्रशासन विभागाच्या (माजी सैनिक कल्याण) प्रधान सचिव सीमा व्यास, मेस्कोचे व्यवस्थापकीय संचालक तथा सैनिक कल्याण विभाग संचालक प्रमोद यादव, उपसचिव ल. गो. ढोके, मेस्कोचे सरव्यवस्थापक कर्नल प्रशांत वानखेडे यांची यावेळी उपस्थिती होती.

मेस्कोमार्फत विविध ठिकाणी सुरक्षा रक्षक पुरवले जातात. त्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींबाबत या बैठकीत चर्चा झाली. मेस्को अधिक चांगल्या पद्धतीने चालले पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या –