Share

देशात गेल्या २४ तासात 8 हजार 306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; तर ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

Published On: 

देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. देशात ओमायक्रॉनचे 21 रुग्ण आढळून आले आहे. तर देशात गेल्या २४ तासात  8 हजार 306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या २४ तासात देशात 211 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली आहे.

देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल 98 हजार 416 आहे. तर देशात आतपर्यंत तब्बल 4 लाख 73 हजार 537 रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासात  8834 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या तब्बल 3 कोटी 40 लाख 69 हजार 608 वर पोहोचली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

आरोग्य बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या