तुम्हाला माहित आहे का भाकरी खाण्याचे फायदे? जाणून घ्या

महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात अशा अनेक ठिकाणी भाकरी खाण्याची पद्धत आहे.  कारण भाकरी हे परिपूर्ण अन्न आहे. अनेक प्रकारच्या धान्यापासून भाकरी करता येते. साधारणपणे तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी या धान्याच्या पिठाची भाकरी करतात. काही जण सर्व प्रकारच्या धान्याचे पीठ एकत्र करून त्याची भाकरी करतात. ज्यामुळे सर्व प्रकारची तृणधान्ये आहारातून शरीरात जातात. भाकरीमधून शरीराला पुरेसे फायबर्स, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, कार्बोहायड्रेड मिळतात. ज्यामुळे तुम्ही तुमच्या गव्हाच्या पोळीच्या ऐवजी आहारात सर्व प्रकारच्या धान्याच्या भाकरीचा नक्कीच समावेश करू शकता. कारण ती आरोग्यासाठी  जास्त लाभदायक आहे. भाकरी खाण्यामुळे तुमच्या ह्रदयाच्या आणि मेंदूच्या कार्याला चांगली चालना  मिळते. यासाठी जाणून घ्या भाकरीचे विविध प्रकार आणि त्याचे फायदे..

  • बाजरी उष्ण गुणधर्माची असल्याने बाजरीची भाकरी थंडीच्या दिवसात खाण्याने शरीराला पुरेशी ऊर्जा आणि उष्णता मिळते. बाजरीच्या भाकरीमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. या भाकरीमुळे पचनक्रिया सुधारल्यामुळे तुम्हाला अपनाची समस्या  जाणवत नाही. पर्यायाने तुमचे वजन कमी होण्यास चांगली मदत होते.
  • नाचणीत भरपूर प्रमाणात फायबर्स, प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम आणि लोह असतं. नाचणीच्या भाकरीतून ते तुमच्या शरीराला सहजपणे मिळतं. नाचणी खाण्यामुळे शरीराची  झीज लवकर भरून काढली जाते. यासाठीच अशक्तपणा अथवा आजारी व्यक्तीला नाचणीची भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो. नाचणी थंड स्वरूपाची असल्यामुळे उन्हाळ्यात आहारात नाचणीच्या भाकरीचा समावेश जरूर केला जातो.
  • बऱ्याचदा सर्व प्रकारच्या धान्यांचे पीठ एकत्र करून भाकरी केली जाते. अशी भाकरी खाण्याने सर्व प्रकारची धान्ये पोटात जातात. ज्यामुळे पुरेसे फायबर्स शरीरात जातात. सर्व धान्यांमध्ये असलेली पोषक तत्त्वे या माध्यमातून शरीराला मिळतात.
  • ज्वारी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तृणधान्य आहे. ब्लडप्रेशर, अपचनाच्या समस्या, अशक्तपणा, मधुमेह, वजन कमी करण्यासाठी, ह्रदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आहारात ज्वारीच्या भाकरीचा जरूर समावेश करा. शिवाय वजन कमी करण्यासाठी नियमित ज्वारीच्या भाकरी खाण्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या –