शाळा पुन्हा भरणार! ‘या’ तारखेपासून राज्यातील शाळा सुरू होणार

मुंबई: राज्यात कोरोना गेल्या काही महिन्यांपासून वाढत असल्याने राज्यसरकारने कडक निर्बंध लावले होते. या पार्श्वभूमीवर शाळा (School) तसेच महाविद्यालये देखील बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र बुधवारी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर वाढल्याने सुरू झालेल्या शाळा (School बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे अनेक विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला मुकले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे काही खबरदारी घेऊन शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत हलचाली सुरू केल्या गेल्या आहेत. याबाबत वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं २४ जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा (Schools) सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील. मुंबईतील शाळा या २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत, तर राज्यातल्या शाळा या २४ जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –