रात्री पोटावर झोपणे पडेल महागात, होतील ‘हे’ मोठे नुकसान

निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाला किमान 8 तासाची झोप आवश्यक आहे. मात्र रात्रीच्या वेळेस तुम्ही कोणत्या स्थितीमध्ये  झोपता हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. जेवणानंतर किमान 2-3 तासानंतर झोपावे. अन्यथा पचनक्रियेमध्ये बिघाड होऊ शकतो. झोपताना थेट पोटावर झोपण्याऐवजी एका कुशीवर झोपावे. आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने डाव्या कुशीवर झोपणं फायदेशीर ठरते. पण पोटावर झोपणे म्‍हणजे आरोग्‍याचे मोठे नुकसान करणे आहे. चला तर मग जाणून घेऊ नुकसान ….

  • पोटावर झोपल्यावर हाडे योग्य स्थितीत नसल्यास गुडघे दुखण्याची शक्यता जाणवते.
  • पोटावर झोपल्यानंतर मान एका साईडला असते. यामुळे मानेचे स्नायू ताणवतात आणि रक्त परिसंचरण चांगले होत नाही
  • पोटावर झोपल्‍याने अन्न योग्य प्रकारे पचन होत नाही. अन्न व्यवस्थित पचले नाही तर इनडाइजेशन सारखी समस्या सुरू होते
  • पोटावर झोपल्याने पाठकण्यावर ताण निर्माण होतो. त्यामुळे पाठकणा हा शरीराचा आधार असल्याने त्यावर ताण निर्माण झाल्यास शरीराचे बाकी अवयव सुन्न होतात आणि अंग दुखू लागते.
  • पोटावर झोपल्याने गुडघ्याचे दुखणे, मानदुखी, पाठीदुखी सारख्या समस्या जडतात. त्यामुळे तुमची झोप नीट होत नाही आणि दुसऱ्या दिवशी थकल्यासारखे वाटते.

महत्वाच्या बातम्या –