Share

चवळी लागवड पद्धत, जाणून घ्या कशी करावी

Published On: 

🕒 1 min read

चवळी

मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते, पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी.

  1. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी.
  2. हेक्टरी ५ टन शेणखत / कंपोस्ट खत द्यावे. मृगाचा पाऊस झाल्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात.
  3. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी योग्य पाऊस होताच वाफसा आल्यावर पेरणी करावी.
  4. हेक्टरी बियाणे प्रमाण : १५ ते २० किलो.
  5. पेरणी अंतर : दोन ओळीत ४५ सें.मी. व दोन रोपात १० सें.मी. ठेवावे.
  6. बीजप्रक्रिया – १ किलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम कार्बेन्डेझीम चोळावे. यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धन १० ते १५ किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.
  7. चवळी : २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद या प्रमाणे रासायनिक खताची मात्र द्यावी. म्हणजेच १२५ किलो डीएपी प्रति हेक्टर प्रमाणे पेरणी करताना खत द्यावे.
  8. पीक २०-२५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी.
  9. पेरणीनंतर ३० ते ३५ दिवस पीक तणविरहीत ठेवावे.
  10. सुधारित वाण :

.नं.

वाण

प्रसाराचे वर्ष

पिकाचा

कालावधी

(दिवस)

उत्पादन

क्विं./हे.

वैशिष्ट्ये

लागवडीचा प्रदेश

चवळी वाण
१. कोकण सदाबहार

(VCM – ८)

१९९६ ६०-६५ १२-१५ लवकर तयार होणारा वाण,

वर्षभर लागवडीसाठी योग्य,

मध्यम आकाराचे दाणे

महाराष्ट्र
२. कोकण सफेद १९९९ ७०-७५ १४-१६ टपोरे सफेद दाणे महाराष्ट्र
३. फुले पंढरी २००७ ७०-७५ १४-१६ तांबडे मध्यम दाणे महाराष्ट्र

महत्वाच्या बातम्या – 

पिक लागवड पद्धत बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या