लवंग खाल्याने वाढेल रोगप्रतिकारक शक्ती, जाणून घ्या फायदे

लवंग ही भारतात तसेच आग्नेय आशियात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याचे बी विडयाचे पानातील एक घटक आहे. लवंगाचे झाड नेहमी हिरव्यागार पानांनी भरलेले सदाहरित असते. उंची १२-१३ मीटर असते. खोडाची साल पिवळट, धुरकट, तसेच कोवळी असते. या झाडाचे बुंध्याला चारही बाजूला कोवळ्या व खाली वाकणाऱ्या फांद्या असतात. याची पाने मोठी व अंडाकार असतात. लवंगाचे फुल निळसर तांबडे असते. तेच वाळून लवंग म्हणून बाजारात आणतात. याला साधारण नऊ वर्षांनी फुले येतात.लवंग स्वयपाकात व मसाल्यात वापरले जातात. चला तर जाणून घेऊ फायदे….

  • लवंगातील गॅस्ट्रिक रसामुळे पचनक्रिया सुधारते. यासाठी २ लवंग किसून ते अर्धा कप पाण्यात घालून उकळवा. त्यानंतर पाणी थंड झाल्यावर ते प्या. असे रोज तीन वेळा केल्याने गॅसची समस्या दूर होण्यास मदत होईल. गॅस, जळजळीसारख्या समस्यांवर गुणकारी ठरेल.
  • लवंगामध्ये एंटीसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे मळमळ, उलटीसारखे वाटणे, यावर लवंग चघळणे फायदेशीर ठरते. कारण गर्भारव्यस्थेत अनेक महिलांना सकाळी उठल्यावर उलटी, मळमळ जाणवते. यावर लवंगासारखे दुसरे औषध नाही.
  • शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरेल. कारण त्यामुळे इंफेक्‍शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल. लवंगात असलेल्या अँटी ऑक्‍सीडेंटमुळे त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढीस लागते.
  • तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी लवंगाचा फायदा होतो. लवंगाचा नियमित वापर केल्यास या समस्येपासून सुटका मिळेल. रोज सकाळ-संध्याकाळ दोन-तीन लवंग चघळल्यास खोकला दूर होईल आणि तोंडाची दुर्गंधीही दूर होईल.
  • आजकाल टुथपेस्टमध्ये लवंग हा प्रमुख घटक असतो. याचे कारण म्हणजे दातांचे दुखणे दूर करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. दात खूप दुखत असल्यास कापसावर लवंगाचे तेल घेऊन ते दुखत असलेल्या दाताला लावा. दातदुखी पळून जाईल.

महत्वाच्या बातम्या –