अळू लागवड तंत्रज्ञान, हंगाम आणि लागवड पद्धती, माहित करून घ्या

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील भागांत अळूची लागवड कमी-अधिक प्रमाणात केली जात आहे. अळू हे उष्ण कटिबंधातील एक महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. भारतामध्ये प्रामुख्याने दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये हे पीक घेतले जाते.

अळू हे जोमाने वाढणारे पीक आहे. याच्या पानांचा वापर वडी तयार करण्यासाठी केला जातो, तर कंद उकडून खातात. नारळ, सुपारी बागेत आंतरपीक किंवा सलग पीक म्हणून अळूची लागवड करता येते.

जमीन नांगराने १५ ते २० सेंटिमीटर खोल नांगरून ढेकळे फोडून भुसभुशीत करावी. जमीन तयार करताना हेक्टरी २५ ते ३० टन शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि २०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे.

फेब्रुवारी – मार्च किंवा जून – जुलैमध्ये सरी – वरंबा पद्धती ने करतात. ४५ x ३० सेंमी अंतरावर ६ – ८ सेमी खोल लागवड करावी. अळूच्या लागवडीसाठी कोंब फुटलेले आणि निवडक कंद वापरावे. एकरी 325 ते 400 किलो कंद बियाणे लागते. एक एकर क्षेत्रात लागवड करण्यासाठी अंदाजे प्रत्येकी 25.30 ग्रॅम कंदाचे वजन असलेले 500 ते 550 किलो बियाणे लागते.

महत्वाच्या बातम्या –